Hardcore Hindutva suffers setback after Madhya Pradesh, Rajasthan, Chhatisgarh election results
Hardcore Hindutva suffers setback after Madhya Pradesh, Rajasthan, Chhatisgarh election results  
देश

#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम

सम्राट फडणीस

धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे. 

काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही संकल्पना सर्वसमावेशक आहे. हिमालयाच्या कुशीत आणि गंगेच्या विशाल पात्राभोवती विणलेली आहे. गोदावरी, कावेरी आणि सह्याद्रीच्या डोंगर कपारींनी सजलेली आहे. भाषेसाठी रक्त सांडणाऱया तमिळींनी तिला बळ दिलेले आहे. भारत हा कडव्यांचा देश कधीही नव्हता. कडवेपणाला झुगारून देऊन सर्व जाती-धर्मांना एकत्र बांधणारा भारत आहे. या मूळ संकल्पनेला गेल्या सत्तर वर्षांत जेव्हा जेव्हा उजव्या विचारसरणीने छेद देण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा भारतीय जनतेने समतोल साधला आहे. 

अयोध्येच्या दरवाज्यांचे कुलूप उघडल्याचा आणि शहाबानो पोटगी निकाल फिरवण्याच्या चुकांचा धडा काँग्रेसने घेतला आणि तीन दशकांपूर्वी आघाडीच्या राजकारणाला जन्म दिला. आघाडीचे राजकारण स्थिरावल्यावर काँग्रेस पक्ष सुस्तावला. या सुस्तीचा अंमल देशभर पसरला असताना नरेंद्र मोदींनी चमत्कार घडवला. काँग्रेस नामशेष होण्याच्या वाटेला लागला.

आघाडीतल्या घटक पक्षांची नाराजी, सुस्तावलेली व्यवस्था, नाविन्यतेचा अभाव या पार्श्वभूमीवर मोदींचा 'मित्रोsss' देशाला भावला. राज्यांना भावला. केंद्रातीलच नव्हे, एकापाठोपाठ एका राज्यातली काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. भाजपच्या मोदी-अमित शहा जोडीकडं काहीही करण्याची क्षमता असल्याचे वातावरण तयार झाले. मोदी विकासाबद्दल बोलत होते. त्यांना प्रतिसाद होता. मोदी फक्त बोलतच राहिले आणि कृतीत जातीय तेढ, बेरोजगारी, शेतीची दुरवस्था उतरली. त्याचे परिणाम राजस्थानपासून ते छत्तीसगढपर्यंत दिसत आहेत. 

भारत एककल्ली नाही. विविधतेत एकता मानणारा देश आहे. इथं जाती-समुदाय एकत्र नांदतात. अशा परिस्थितीत कट्टर हिंदुत्ववाद विशिष्ट क्षमतेपलिकडे प्रभावी ठरत नाही. केंद्रापाठोपाठ राज्यांमध्ये आलेल्या सत्तेनंतर भाजप आणि विशेषतः संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववाद्यांना भारत संकल्पनेच्या वास्तवाचा विसर पडला. जस जसा भाजपचा विजयरथ दौडत सुटला, तस तसा देशामध्ये कट्टर हिंदुत्ववाद्यांना अक्षरशः उन्माद चढला. हा देश सर्वधर्मियांना सामावून घेणारा आहे, हे स्वप्नं वाटावं अशा घटना घडत गेल्या. तरीही केंद्रातीत सत्तेवर बसलेल्यांना त्याची फिकीर वाटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशिष्ट प्रसंगांमध्ये पाळलेले मौन उन्मादी शक्तींना आणखी पसरण्याचे जणू अवताण होते. 

या देशातील हिंदू सहिष्णू आहे. त्याला पुढे जायचे आहे. त्याला विकास हवा आहे. त्याला महासत्ता बनायचे आहे. रोजगार-उद्योगात त्याला प्रगती हवी आहे. तो शेतकरी आहे. व्यापारी आहे. नोकरदार आहे. विद्यार्थी-शिक्षक आहे. उद्योजक आहे. एकही असं क्षेत्र नाही, ज्यात हिंदू नाही. हा साराच्या सारा हिंदू कट्टर आहे आणि त्याला राम मंदिर वगैरेच हवंय असा समज घेऊन उभ्या राहिलेल्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी धुमाकूळ घातला. गुजरातची निवडणूक ही पहिली झलक होती, जेव्हा देशातल्या कट्टर हिंदुत्ववाद्यांना कुठंतरी धक्का बसला होता. त्याचवेळी ही पहिली निवडणूक होती, ज्यामध्ये काँग्रेसने हा देश हिंदुबहूल आणि तरीही सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, याची दखल घेतली होती.

काँग्रेसने सहिष्णू हिंदुत्वाचा स्विकार करणे आणि संघ परिवाराने, भाजपने कट्टर हिंदुत्वाची लाईन घेणे हा सगळा गेल्या अठरा महिन्यातला खेळ आहे. या खेळाचा निकाल आज लागला. 

एका क्षमतेनंतर भारताचे नागरीक जात-धर्म विसरून समतोल साधतात आणि देश म्हणून उभे राहतात. उत्तर प्रदेशात वाढलेल्या जातीय तणावाचा 'फायदा' राजस्थानात होणार हे गृहित धरून चाललेल्यांना हा देश समजलेला नाही. दोन-चार उद्योगपतींसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखविणाऱयांना या देशातील मोठा वर्ग आजही शेतीवर अवलंबून असल्याचे कळलेले नाही. 'हम करे सों कायदा' मानणाऱयांना या देशात घटना आहे, हे जाणवलेले नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणातील निवडणूक निकालानंतर ही समज सत्तेवर असलेल्या भाजपला येईल, इतकी अपेक्षा ठेवू या. नाही आली समज, तर 'राजस्थान झाँकी है...लोकसभा बाकी है...' हे ठरलेलेच !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT