Karnataka Election 2023 Jagdish Shettar and Mahesh Tenginkai
Karnataka Election 2023 Jagdish Shettar and Mahesh Tenginkai esakal
देश

Karnataka Election : कर्नाटकात 'ही' लढत ठरणार हायहोल्टेज, माजी मुख्यमंत्र्यांसमोर शिष्याचं कडवं आव्हान

महेश काशीद

हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, या निवडणुकीत राजकीय स्थिती वेगळी आहे.

Karnataka Election 2023 : हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघात गुरू विरुद्ध शिष्य अशी लढत होणार आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर ते निवडणूक लढवीत आहेत. परंतु, त्यांच्याविरुद्ध त्यांचेच शिष्य महेश टेंगिनकाई हे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे गुरू विरुद्ध शिष्य अशा लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील हायहोल्टेज लढत

हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघातील लढत ही राज्यातील हायहोल्टेज ठरली आहे. जगदीश शेट्टर यांनी येथून सहावेळा विजय मिळविले आहे. त्यासाठी हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, या निवडणुकीत राजकीय स्थिती वेगळी आहे. शेट्टर यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरुध्द भाजपच्या उमेदवारीवर टेंगिनकाई हे निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे टेंगिनकाई यांचाही शेट्टर यांच्याइतका मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे मतदारसंघातील दुरंगी लढत राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

टेंगिनकाई भाजपचे प्रदेश सरचिटणीस

महेश टेंगिनकाई हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. टेंगिनकाई यांचा युवा मोर्चाशी त्यांचा चांगला संपर्क राहिल्यामुळे भाजप संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेले ५२ वर्षीय महेश टेंगिनकाई गेल्या ३३ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. १९८९ मध्ये बूथस्तरीय कार्यकर्ता म्हणून पक्षात प्रवेश केल्यावर त्यांनी हळूहळू आपले स्थान भक्कम केले. तर २००४ मध्ये भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१९ पासून ते भाजप सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.

टेंगिनकाई लिंगायत समाजाचे कणखर नेते

महेश टेंगिनकाई यांच्या कामाची दखल घेऊन भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे टेंगिनकाई यांची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. पहिल्या विधानसभा निवडणुकीत महेश टेंगिनकाई यांच्यापुढे तगडे आव्हान आहे ते जगदीश शेट्टर यांचे. त्यामुळे टेंगिनकाई यांना गुरू विरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान आहे. टेंगिनकाई हे लिंगायत समाजाचे एक कणखर नेते आहेत. हुबळी-धारवाड भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे.

शेट्टरांच्या विजयात टेंगिनकाईंची महत्वाची भूमिका

टेंगिनकाई हे जवळपास दशकांपासून भाजपशी संबंधित आहेत. त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. शिवाय एक व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहेत. हुबळी-धारवाड सेंट्रलमधील विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची होऊ शकते. टेंगिनकाई व शेट्टर लिंगायत समाजातील लोकप्रिय नेते आहेत. दोघांकडेही जनाधार आहे. दोघांनी अनेक वर्षे राजकारणात एकत्र काम केले आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे सहा वेळा या भागामधून विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयात टेंगिनकाई यांनी महत्वाची भूमिका बजाविल्याचे मानले जाते.

भाजपकडून टेंगिनकाई तर ‘आप’कडून सोप्पीन रिंगणात

२०१८ मध्ये भारतीय जनता पक्षाचे जगदीश शेट्टर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. महेश नालवाड यांचा २१,३०६ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत उमेदवार शेट्टर असले तरी त्यांनी पक्ष बदलला आहे. काँग्रेसकडून ते रिंगणात असून भाजपकडून महेश टेंगिनकाई तर ‘आप’कडून विकास सोप्पीन निवडणूक लढवीत आहेत. एकंदरीत शेट्टर यांनी पक्ष बदलल्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पहिल्यांदा निवडणूक लढविणारे भाजप उमेदवार महेश टेंगीनकाई यांच्यापुढे असलेले आव्हान ते कसे पेलणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT