Amit Shah visit Karnataka esakal
देश

Amit Shah : देशद्रोह्यांना बळ देणारा काँग्रेस पक्ष कधीच राज्याचं रक्षण करू शकत नाही; अमित शहांचा हल्लाबोल

काँग्रेस आणि जेडीएस कर्नाटकचं काहीही भलं करणार नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक सुरक्षित ठेवायचं असेल तर ते फक्त भाजपच करू शकतं.

Amit Shah visit Karnataka : सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पुत्तूर इथं त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी शहांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

अमित शहा म्हणाले, काँग्रेसनं (Congress) देशविरोधी पीएफआयच्या (PFI) 1700 सदस्यांची सुटका केली होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेवर बंदी घातली. देशद्रोही घटकांना बळ देणारा काँग्रेस पक्ष कधीही कर्नाटकचं रक्षण करू शकत नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

शहा पुढं म्हणाले, तुमच्या जवळचं राज्य केरळ आहे. मला फार काही बोलायचं नाहीये. कर्नाटक सुरक्षित ठेवायचं असेल तर ते फक्त भाजपच करू शकतं. काँग्रेस आणि जेडीएस (JDS) 18 व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्यावर विश्वास ठेवतात आणि दोन्ही पक्ष कर्नाटकसाठी काहीही चांगले करू शकत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

अमित शाह पुत्तूरमधील सेंट्रल अरेकनट आणि कोको मार्केटिंग अॅण्ड प्रोसेसिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (Central Arecanut and Cocoa Marketing and Processing Cooperative Limited CAMPCO) च्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी कर्नाटकात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपमुळं कर्नाटक समृद्ध - अमित शहा

काँग्रेस आणि जेडीएस कर्नाटकचं काहीही भलं करणार नाहीत. कर्नाटकात जेव्हा-जेव्हा भाजपचं सरकार होतं, तेव्हा ते समृद्ध होतं. देशभरातील शेतकरी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची आठवण काढतात. कारण, त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध केलं. याशिवाय, येडियुरप्पांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूचा देखील विकास केलाय, असंही शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT