Hindu Marriage sakal
देश

Hindu Marriage: सप्तपदी झाली तरच लग्न वैध ठरतं का?

सप्तपदी शिवाय लग्न अपूर्ण असल्याचा अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

हिंदू विवाह कायद्यांतर्गत होणाऱ्या विवाहांमध्ये सप्तपदी हा विधी झाला नसेल तर तुमचा विवाह झाला असे म्हणता येणार नाही, असा निर्वाळा अलाहाबाद न्यायालयाने दिला आहे. मात्र यामुळे आतापर्यंत जे विवाह सप्तपदीशिवाय झालेत ते सर्वच विवाह कायद्याच्या भाषेत अपूर्ण किंवा विवाहच नाही असा याचा अर्थ होतो का?

याबाबत न्यायालय नेमके काय विचार करते, हिंदू विवाह कायदा काय सांगतो, परंपरा काय आहेत आणि नैतिक आणि सामाजिक विचारांच्या पातळीवर याचा कसा अर्थ लावायला हवा या सगळ्यावर उहापोह होण्याची आवश्यकता आहे.

अलाहाबाद न्यायालयात दाखल झालेले हे प्रकरण नेमके काय ते जाणून घेऊया. घटस्फोटित दाम्पत्यामध्ये जोपर्यंत पत्नी दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत तिची जबाबदारी ही पतीची असून तीला महिना चार हजार रुपये पोटगी द्यावी असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे.

मात्र पतीने अर्जात केलेल्या आरोपानुसार पत्नीने विधिवत दुसरा विवाह केला असून ती आता पोटगीसाठी पात्र नाही. यावर दुसऱ्या विवाहात सप्तपदी हा विधी झाला नसल्याने "हिंदू विवाह कायदा १९७७ च्या कलाम ७ नुसार हिंदू विवाह हा पारंपरिक संस्कार आणि समारंभातून केला जातो, या समारंभात सप्तपदी झाल्यानंतरच हा विधी पूर्ण होतो" असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.

भारताच्या अनेक भागांमध्ये लग्न करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक प्रदेशानुसार या पद्धती बदलताना दिसतात. आजही हिंदू कायद्यात लग्नाचे विधी नेमके काय यापेक्षा परंपरेनुसार काय प्रथा चालत आली आहे यानुसार विवाह केले जातात. सद्य परिस्थितीत ग्रामीण भागात होणाऱ्या अनेक लग्नांमध्ये आजही अग्नीला फेरे, सप्तपदी हे विधी होत नाहीत. सामूहिक विवाह करताना देखील अनेकदा सर्वच विधी केले जात नाहीत.

याबाबत कौटुंबिक न्यायालयाच्या अ‍ॅड. रमा सरोदे म्हणाल्या, सप्तपदी झाली म्हणजेच विवाह झाला असे म्हणता येणार नाही. कारण साधारण २००१ च्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल असाही दिलेला ज्यात सप्तपदी झालेली नसतानाही लग्न झाले असे मानले होते. त्यामुळे कोणताही निर्णय देताना सप्तपदी हा एकच निकष लावला जात नाही.

आपल्यातील अनेकांना माहितीच नाहीये की हिंदू विवाह कायद्यानुसार सर्वांना विवाहाची कायदेशीर नोंदणी करणे सक्तीचे आहे. तुम्ही नोंदणी नाही केली तर तुमचा विवाह अवैध ठरत नाही पण याचा अर्थ असा नाही की नोंदणी सक्तीची नाही.

सरोदे म्हणाल्या, याबाबत फारशी जागरूकता नाही. पारंपरिक पद्धतीने विवाह करून सुद्धा नोंदणी करता येते. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी सर्वांनीच नोंदणी करून घ्यावीच असे मी सांगीन.

अनेकदा संबंधित व्यक्ती कोणत्या प्रथा मानते. संबंधित समाजात कशी लग्न होतात. त्यात जर सप्तपदी हा विधी नसेलच तर तो विधी करणे आवश्यक आहेच असे नाही. त्याबरोबर तो कोणत्या प्रकारचा खटला आहे यावर देखील अवलवलंबून असते.

याबाबत मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या संपादिका व लेखिका गीताली वि.म. म्हणतात, प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक स्थानिक परंपरेनुसार विवाह करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. पूर्वीच्या काळात झालेले अनेक विवाह हे सप्तपदी शिवाय देखील झालेले असू शकतात.

या सर्व प्रक्रियेत प्रत्येक केसनुसार हेतू आणि उद्देश आणि न्याय बाजू तपासून निर्णय देणे आवश्यक आहे. नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यास अर्थातच या गोष्टी काही प्रमाणात टाळता येणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT