Arvind Kejriwal criticising PM Modi over India-Pakistan cricket match amid Trump’s alleged pressure.
esakal
Kejriwal latest news: दिल्लीत आम आदमी पार्टी नेत्यांनी आशिया कप २०२५मध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून जोरदार विरोध प्रदर्शन केलंय. आपच्या नेत्यांनी आऱोप केलाय की, सरकार दहशतवाद आणि क्रिकेटला वेगवेगळे मानून देशाच्या भावनांशी खेळत आहे. तर अरविंद केजरीवाल यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटले की, हा सामना ट्रम्प यांच्या दबावात खेळवला जात आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांना पाकिस्तानबरोबर मॅच करण्याची अखेर काय गरज आहे? संपूर्ण देश म्हणतोय की, ही मॅच नाही झाली पाहीजे, मग ही मॅच का खेळवली जात आहे?
याशिवाय केजरीवालांनी पुढे ही देखील भीती व्यक्त केली की, हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात तरी घेतला गेला नाही ना? तसेच, त्यांनी निशाणा साधत म्हटले की, हे देखील ट्रम्पच्या दबावाखालीच केलं जात आहे? अखेर ट्रम्पसमोर किती झुकणार?
आम आदमी पार्टीचे दिल्लीचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, आमच्या २६ बहिणींचे कुंकू पुसले गेले. दहशतवाद्यांनी त्यांना निवडून निवडून मारले. सरकारने म्हटले होते की, आम्ही ऑपरेशन सिंदूर सुरू करू...तर मग आमचा क्रिकेट संघ अशा लोकांसोबत कसं काय क्रिकेट खेळू शकतो? तसेच, भारद्वाज यांनी पुढे म्हटलं की, आमचे सरकार म्हणायचे, की व्यापार आणि दहशतवाद एकसोबत नाही चालू शकत. तर मग क्रिकेट आणि दहशतवाद एकसोबत कसं काय चालू शकतात?
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं की, पाकिस्तानासोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय देशाचे बलिदान आणि जनतेच्या भावनेचा अपमान आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने तत्काळ ही मॅच रद्द करायला हवी. एवढंच नाहीतर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी असा इशाराही दिला की, जर सरकारने निर्णय बदलला नाही, तर यापुढे आम्ही विरोध अधिक तीव्र करू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.