Covid 19 test
Covid 19 test Sakal
देश

पटियाला मेडिकल कॉलेजमध्ये Covid विस्फोट! 100 विद्यार्थी पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

भारतात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट Omicron चा संसर्ग खूप वेगाने वाढत आहे.

जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 (Covid-19) च्या दोन लाटांनंतर आता ओमिक्रॉन (Omicron) या नवीन व्हेरिएंटच्या रूपाने कोरोनाची तिसरी लाट दारात उभी आहे. भारतातही कोरोनाचा नवीन व्हेरिएंट Omicron चा संसर्ग खूप वेगाने वाढत आहे. हा नवीन व्हेरिएंट आणखी 20 राज्यांमध्ये पसरला आहे. पंजाबच्या (Punjab) पटियाला मेडिकल कॉलेजच्या (Patiala Medical College) 100 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॅबिनेट मंत्री राज कुमार वेरका (Cabinet Minister Raj Kumar Verka) यांनी याला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी वसतिगृहात (Hostel) राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ त्यांच्या खोल्या सोडण्यास सांगितले आहे. (Hundreds of students at Patiala Medical College have infected Corona)

पंजाबमध्येही 14 लाख बालकांचे लसीकरण (Covid Vaccine) केले जाणार आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री ओ पी सोनी (O P Soni) यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले. सोनी म्हणाले की, पंजाबमध्ये सुमारे 14 लाख मुलांना लसीकरण केले जाणार आहे. पंजाब सरकार कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, परंतु प्रत्येकाने यासाठी प्रभावी शस्त्र म्हणजे कोरोना लसीकरण करून घ्यावे. अमृतसर (Amritsar) जिल्ह्यातील एक लाख 12 हजार बालकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंजाबमधील सर्व रुग्णालयांमध्ये सुरू होतील स्कॅनिंग सेंटर

ओ पी सोनी यांनी सांगितले की, पंजाबमधील सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये स्कॅनिंग केंद्रे (Scanning Centers) उघडली जातील, ज्यामध्ये एमआरआयसह (MRI) सर्व प्रमुख चाचण्या अत्यंत कमी खर्चात केल्या जातील. अमृतसर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये अशाच एका केंद्राचे उद्‌घाटन करताना सोनी म्हणाले की, पंजाब सरकारने देशातील सर्वात मोठ्या कंपनीशी करार केला आहे, जी ही सर्व केंद्रे पीपी मोडवर बनवेल.

त्यांनी सांगितले की, ही केंद्रे सरकारने निश्‍चित केलेल्या चाचणी दरांवर त्यांची सेवा देतील, जे कमर्शियल दरापेक्षा 60 ते 70 टक्के कमी आहेत. पंजाबमधील सहा प्रमुख नागरी रुग्णालयांमध्ये एमआरआय केंद्रे, 25 रुग्णालयांमध्ये स्कॅनिंग केंद्रे, मोहालीमध्ये एक राज्यस्तरीय प्रयोगशाळा (Laboratory), जिल्हा रुग्णालयांमध्ये 30 पॅथॉलॉजी लॅब (Pathology Labs) आणि लहान आरोग्य केंद्रांसाठी 95 संकलन केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत ही सर्व केंद्रे सुरू होतील, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT