husband died wife kept sitting next to him thinking he was sleeping traveled with dead body for 13 hours in Sabarmati express train  Esakal
देश

शेजारी बसलेल्या पतीचा झाला मृत्यू, पण पत्नीला समजलंच नाही! मृतदेहासोबत केला 13 तास प्रवास

मृत व्यक्ती आपली पत्नी, मुले आणि एका साथीदारासह सुरतहून अयोध्येला जात होता. या प्रवासादरम्यान त्याला ट्रेनमध्येच झोप लागली. मात्र अनेक तास उलटूनही तो न उठल्याने शेजारी बसलेल्या लोकांना संशय आला. त्याला हलवल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अहमदाबादहून अयोध्येला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर कोचमधील प्रवाशांनी तब्बल 13 तास मृतदेहासोबत प्रवास करावा लागला. 13 तासांनंतर ट्रेन झाशी रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर डब्यातून मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर जीआरपीने मृतदेह ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली. तब्बल १३ तास मृताची पत्नी मृतदेहासोबत बसून राहिली. पण, तिला याबाबत काहीच माहिती नव्हती.

मृत व्यक्ती आपली पत्नी, लहान मुले आणि एका साथीदारासह सुरतहून अयोध्येला जात होते. या प्रवासादरम्यान त्याला ट्रेनमध्येच झोप लागली. मात्र अनेक तास उलटूनही तो न उठल्याने शेजारी बसलेल्या लोकांना संशय आला. त्याला हलवल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या सीट क्रमांक 43, 44, 45 वर मृत रामकुमारची पत्नी, दोन मुले आणि साथीदार सुरेश यादव प्रवास करत होते. रामकुमार हा अयोध्येतील इनायत नगर येथील मजलाई गावचा रहिवासी होता. ते सुरतहून अयोध्येला ट्रेनमध्ये बसले होते. सुरेशने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान रामकुमारला रात्री झोप लागली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी रामकुमार यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही.

सुरेशने सांगितले की, मृत रामकुमारची पत्नी आणि मुले सोबत होते, त्यामुळे त्यांने प्रवासादरम्यान त्यांना काहीही सांगितले नाही. कारण, ट्रेनमध्ये गोंधळ झाला असता. रामकुमार यांच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुबिंयाना कोणतीही माहिती नव्हती. रात्री 8.30 वाजता ट्रेन झाशीच्या वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर पोहोचली तेव्हा जीआरपीच्या मदतीने रामकुमारचा मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

काय म्हणाली मृताची पत्नी?

मृताची पत्नी प्रेमा हिने रडत रडत सांगितले की, 8 वाजता तिने तिच्या पतीला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. त्याचे अंग तापले होते, त्यामुळे आम्हाला काही समजले नाही. आम्ही त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच बोलत नव्हता. यावर आम्हाला वाटले की, तो झोपला आहे पण तो कायमचा झोपला होता.

त्याचवेळी मृत व्यक्तीचा साथीदार सुरेश यादव म्हणाला - आम्ही साबरमतीहून येत होतो. रामकुमार भाई आजारी होता. सुरतमध्ये तो गाडी चालवायचा. त्याचा काही काळ आधी अपघात झाला होता.त्याला चांगल्या रूग्णालयात दाखवूनही तो ठिक होत नव्हता. रेल्वेत बोलत होतो, तेव्हा तो अचानक झोपला. त्यानंतर त्याचा मृत्यू कधी झाला आम्हाला समजले नाही. कदाचित सकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला असावा. भीतीने वाटेत कोणाला काही सांगितले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : बजेटआधी शेअर बाजार तापला! या आठवड्यात 5 नवे आयपीओ उघडणार; 'या' मोठ्या कंपनीची लिस्टिंग होणार

Philippines Ferry Accident : टायटॅनिक सारखी भीषण दुर्घटना ! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, १८ जणांचे मृतदेह हाती

Latest Marathi news Update : उत्तराखंड सरकारने समान नागरी संहिता (सुधारणा) अध्यादेश, २०२६' लागू केला

Indian Flag: प्रजासत्ताक दिनानंतर राष्ट्रध्वज खराब झाला किंवा फाटला तर काय करावं? वाचा कायदा काय सांगतो

प्रजासत्ताक दिन 2026 विशेष: ‘बॅटल ऑफ गलवान’मधील ‘मातृभूमी’पासून सदाबहार देशप्रेम जागवणारी गीते

SCROLL FOR NEXT