husband murder wife at bhind madhya pradesh 
देश

वहिणीकडे सतत का पाहता असे म्हणाली अन्...

वृत्तसंस्था

भिंड (मध्य प्रदेश): दीर आणि वहिणीच्या अनैतीक संबंधाबद्दल पत्नीला समजले होते. वहिणीकडे तुम्ही सतत का पाहता असे पत्नी म्हणाल्यानंतर त्याने गोळी झाडून पत्नीची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

देवीपुरा गावामध्ये पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती आणि सासू-सासऱयाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम आणि देवेंद्र यांचा 2016 मध्ये विवाह झाला आहे. दोघांना 4 वर्षाचा मुलगा आणि 11 महिन्यांची मुलगी आहे. पण, देवेंद्रचे वहिणीसोबत अनैतिक संबंध होते. याबद्दलची माहिती पुनमला समजली होती. सोमवारी (ता. 24) संध्याकाळी पुनम घरामध्ये स्वयंपाक करत असताना देवेंद्र घरामध्ये आला होता. पुनमने अनैतिक संबंधाबद्दल विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये भांडण सुरू झाले. देवेंद्रने पिस्तूल काढला आणि पुनमवर गोळीबार केला. या घटनेत पुनमचा जागीच मृत्यू झाला. परंतु, या घटनेनंतर पुनमचा मृतदेह घराच्या मोकळ्या जागेत आणून धडकल्यामुळे मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तिच्या शेजारी दोन्ही मुले होती. तर नवरा फरार झाला होता. याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर नवरा, सासू व सासऱयाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

पुनमचे काका रामवरन सिंह कुशवाह यांनी सांगितले की, 'पुनमला शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता. देवेंद्रचे वहिणीसोबत अनैतिक संबंध असून, गावामध्ये चर्चा आहे. पुनमचा अडथळा दूर करण्यासाठी खून करण्यात आला आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

VIDEO : बस चालवत असतानाच चालकाला अचानक आला हृदयविकाराचा झटका; मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रवाशांचे प्राण वाचवले, पण स्वत:...

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

SCROLL FOR NEXT