I demolished babri masjid controversial statement by sadhvi pragya singh 
देश

साध्वी प्रज्ञा म्हणते, 'होय, मी बाबरी मशीद पाडली अन् याचा अभिमान'

सकाळवृत्तसेवा

भोपाळ : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्यावर चिखलफेक करुन झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करत नोटीस पाठवली आहे. 

करकरे यांना मी शाप दिल्याने 21 दिवसांत सुतक संपल्याचे वक्तव्य साध्वींनी केले होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावलेले हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. एवढ्यातच साध्वी यांनी असेच काहीसे भडकवणारे वक्तव्य पुन्हा केले आहे. आता त्या म्हणतात, 'बाबरी मशीदचा ढाचा मीच पाडला. बाबरी मशीदीवर चढून मी इतर लोकांना मशीद पाडण्यात मदत करत होते. मी मशीदीच्या छतावर चढून ते तोडले होते. मला अभिमान आहे की देवाने मला ही संधी दिली आणि शक्ती दिली. म्हणूनच मी हे काम केले. आता तेथेच आम्ही राम मंदिर बनविणार.'

एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना राम मंदिराच्या मुद्द्यावर साध्वी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, 'राम मंदिर निश्चितच उभारण्यात येईल. हे मंदिर भव्य असेल. आम्ही मंदिराची निर्मिती करु. कारण आम्ही ढांचा (बाबरी मशीद) ला उध्वस्त करण्यासाठी पण तर गेलो होतो.'

साध्वी यांच्या या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने लगेच साध्वी यांना निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठविली. एवढेच नव्हे तर, मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी वी एल कांताराव यांनी सर्वच राजकीय पक्षांसाठी काही सूचना देखील लागू केल्या आहेत. ज्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, 'नेहमी नेहमी निवडणूकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आणि अपमानजनक भाषेचा वापर केल्यास कडक कारवाई केली जाईल.'

संबंधित बातम्या -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

Nashik Fruit Market : भाजीपाला स्वस्त, पण फळांचे भाव गगनाला! अमेरिकेचे सफरचंद 300 तर, न्यूझीलंडची किवी 600 रुपये किलो; ऑस्ट्रेलियाची संत्री, थायलंडच्या 'ड्रॅगन'ला काय भाव?

Live News Update Marathi: कोल्हापूर विमानतळावरून अमली पदार्थांची तस्करी

Satara NH4 CNG Tanker Gas Leak Today : पुणे-बंगळूर हायवेवर सीएनजी टँकरमधून मोठी गॅस गळती! साताऱ्याजवळ नागरिकांची पळापळ, हायवेवरील वाहतूक रोखली?

Stock Market ITR: शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांनी कोणता ITR भरावा? ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या हे 5 नवे नियम, नाहीतर...

SCROLL FOR NEXT