icmr got 17174 cr in royalty from covaxin sale  Sakal
देश

कोव्हॅक्सिन विकून आयसीएमआर झालं कोट्याधीश

भारत बायोटेककडून आयसीएमआरला 171.74 कोटींची रॉयल्टी मिळाली आहे

सकाळ डिजिटल टीम

कोव्हॅक्सिनच्या विक्रीतून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (ICMR) भारत बायोटेककडून 31 जानेवारी 2022 पर्यंत 171.74 कोटींची रॉयल्टी मिळाली आहे. परिषदेने कोवॅक्सिनच्या (Covaxin) संशोधन - विकासासाठी सुमारे 35 कोटी खर्च केले आहेत. ICMR चा निधी संशोधनासाठी प्राधान्यक्रम, संशोधन क्षमता वाढीसह आरोग्य संशोधन उपक्रमांसाठी वापरला जातो, असे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी संसदेच्या (Parliament) वरिष्ठ सभागृहात सांगितले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी याविषयी माहिती दिली.

भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही भारतातील स्वदेशी लस तयार केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या सहकार्याने कंपनीने ही लस विकसित केली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत कोरोनामुळे (Corona)मृत झालेल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार 1616 दावे निकाली काढण्यात आले आहेत. PMGKP): विमा योजना (31 जानेवारी 2022 पर्यंतचा डेटा).

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी डेरेक ओ'ब्रायन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मृत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार 1616 दावे निकाली काढण्यात आले आहेत.नुकसानभरपाई मिळण्यासाठी आंध्र प्रदेश (₹80 कोटी), बिहार (₹46.5 कोटी), गुजरात (₹69.5 कोटी), महाराष्ट्र (₹100.5 कोटी), राजस्थान (₹68 कोटी) आणि उत्तर प्रदेश (₹67 कोटी) ही राज्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (PMGKP)हे कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी असलेली विमा योजना असून ती 30 मार्च 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सामुदायिक आरोग्यासह आरोग्य सेवा देणाऱ्या 22.12 लाख जणांना 50 लाखांचा वैयक्तिक अपघात संरक्षण विमा द्यायला सुरूवात केली आहे. कामगार आणि खाजगी आरोग्य कर्मचारी जे कोरोना रूग्णांच्या थेट संपर्कात असतील त्यांचाही यासाठी विचार केला आहे, असे मंत्र्यांनी सांगितले. तसेच, खाजगी रुग्णालयातले कर्मचारी /निवृत्त /स्वयंसेवक/ स्थानिक नागरी संस्था/ कंत्राटी/ दैनंदिन वेतन/आउटसोर्स कर्मचारी राज्य/ केंद्रीय रुग्णालये/ केंद्र/राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची स्वायत्त रुग्णालये, AIIMS आणि राष्ट्रीय महत्त्व संस्था (INI) तसेच कोरोना रूग्णांच्या काळजीसाठी तयार केलेली केंद्रीय मंत्रालयांची रुग्णालये ही प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) अंतर्गत येतात. कोरोना विरूद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीएमजीकेपी विमा योजना वेळोवेळी वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

Success Story: रोज आठ ते दहा आभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT