if coronavirus positive withing 24 hrs after shopping get 50000 cashback at kerala 
देश

दुकानदाराच्या 'ऑफर'नंतर खरेदीसाठी गर्दी; पण...

वृत्तसंस्था

तिरुवनंतरुपुरम (केरळ) : लॉकडाऊनदरम्यान व्यवसाय ठप्प झाले होते. पण, लॉकडाऊन उठल्यानंतरही कोरोनाच्या भितीमुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत नाही. यामुळे एका दुकानदाराने एक आगळी-वेगळी जाहिरात केल्यानंतर ग्राहकांची झुंबड उडाली. अखेर, नियमांचे पालन न झाल्यामुळे पोलिसांनी दुकानदारावर कारवाई केली.

केरळमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानदाराने ग्राहकांसाठी ऑफर ठेवली होती. ती म्हणजे, आमच्या दुकानात खरेदी केल्यानंतर 24 तासांत ग्राहकाला कोरोना झाल्यास 50 हजार रुपये कॅशबॅक देणार. संबंधित जाहिरात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवरही झळकली होती. ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. केरळमध्ये कोरोनापासून बचाव होण्यासाठी कठोर असे नियम लागू करण्यात आले आहे. एका दुकानात एकावेळी 20 पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही. पण, ग्राहकांच्या गर्दीनंतर या जाहिरातीविरोधात वकिल बिनू पुलिक्काक्कांदम यांनी याचिका दाखल केली.

याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, 'ज्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे कोरोना रुग्ण पैसे मिळवण्यासाठी दुकानात जाऊ शकतात. संसर्गजन्य असा आजार जाणीवपूर्वक पसरवला जातो आहे. आपल्या फायद्यासाठी व्यावसायिक आपली सामाजिक जबाबदारी विसरत आहेत. आयपीसी कलम 269, माहिती तंत्रज्ञान कायदा 2020, ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील कलम 89 आणि केरळ महापालिका कायद्यातील आरोग्य नियमांचे हे उल्लंघन आहे. त्यांनी गंभीर असा गुन्हा केला आहे."

कॅशबॅकच्या ऑफरमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णदेखील आपला आजार लपवून दुकानात खरेदीसाठी जाऊ शकतात आणि नंतर आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दाखवून कॅशबॅक मागू शकतात ही जाहिरात बेकायदेशीर आणि दंडनीय असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यानंतर पोलिसांनी या दुकानदाराच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT