Corona टिम ई सकाळ
देश

कोरोना झालाय ? बूस्टर डोससाठी नवी नियमावली

कोरोना झाला तर तीन महिन्यापर्यंत कोरोना लस किंवा बूस्टर डोस देता येणार नाही

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच केंद्र सरकार कोरोनाविषयक नवीन नियमावली सादर करत आहे. यात आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवलंय. या पत्रात एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर तीन महिन्यापर्यंत कोरोना लस किंवा बूस्टर डोस देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

देशात लसीकरण जोमाने सुरू आहे. ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले तर हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षावरील नागरीकांस बूस्टर डोज १० जानेवारी २०२२ पासून देण्यास सुरवात झाली. यात केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठविल्यानंतर आता कोरोना संक्रमित असणाऱ्यांना कोरोना लस किंवा बूस्टर डोस घेण्यासाठी ३ महिने वाट पाहावी लागणार आहे.

Letter issued by Government of India to all States

कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिने लस घेता येणार नाही, असे सांगताना राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट (National Technical Advisory Group on Immunisation) याबाबत सातत्याने आढावा घेत असतो. त्यात काही बदल करायचे असतील तर त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT