नवी दिल्ली : सेलिब्रेटी इंग्रजी कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथील जीवघेण्या हल्ल्याचा भारतानं गुरुवारी पहिल्यांदा निषेध नोंदवला. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी इच्छाही भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे. ७५ वर्षीय रश्दी यांच्यावर भाषणादरम्यान न्यूयॉर्कमध्ये १२ ऑगस्ट रोजी एका तरुणानं मानेवर चाकूनं वार केले होते. या हल्ल्यामध्ये रश्दी गंभीररित्या जखमी झाले आहेत. (India condemns horrific attack on author Salman Rushdie)
भारतानं या रश्दींवरील हल्ल्याचा निषेध नोंदवताना म्हटलं की, "भारत कायमच हिंसाचार आणि मुलतत्ववाद्यांच्या विरोधात उभा राहिला आहे. आम्ही रश्दींवर झालेल्या या भयानक हल्ल्याचा निषेध करतो तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी इच्छा व्यक्त करतो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आपल्या आठवडी पत्रकार परिषदेत ही भावना व्यक्त केली"
रश्दींवरील हल्ल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद उमटले होते. जगभरातून अनेकांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला, तसेच या लेखकाला जोरदार पाठिंबा दर्शवला. रश्दी अनेक वर्षे अनेक देशांमध्ये फिरत राहिले. कारण त्यांच्याविरोधात इऱाणचा हुकुमशहा आयतुल्ला रुहोल्ला खोमेनी १९८९ मध्ये जीवे मारण्याचा फतवा जाहीर केला होता. दि सॅटेनिक वर्सेस या रश्दींच्या पुस्तकाविरोधात हा फतवा काढण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.