Indian Railways
esakal
Indian Railways Confirm Ticket Date Change Without Extra Charges : भारतीय रेल्वेच्या तिकिटांसाठी आपल्याला कायमच गर्दी, वेटींग दिसत असते. सणासुदीच्या काळात तर तिकीट मिळणं जवळपास अशक्यच होतं. त्यातही जर कसंबसं बुक केलेलं तिकीट ऐनवेळी काही कारणास्तव रद्द करावं लागलं किंवा त्या तिकीटाच्या तारखेत काही घोळ झाला, तर प्रवाशाला भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र आता रेल्वे विभागाकडून लवकरच प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी बातमी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वे लवकरच आपल्या प्रवाशांना एक नवीन सुविधा देणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटांवरील तारीख बदलता येणार आहे आणि ते देखील विनाशुल्क. रेल्वे विभागानकडून लवकरच हा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती आहे आहे, यामुळे प्रवाशांना खरोखऱ मोठा दिलासा मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. हा बदल प्रवाशांसाठी दिलासा देणार आहे. त्यांना त्यांच्या कन्फर्म तिकिटांवर तारीख बदलण्याचा पर्याय दिला जाईल आणि महत्त्वाचे म्हणजे, असे करण्यासाठी कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत.
सध्या, प्रवाशांनी त्यांचा प्रवास रद्द केल्यास त्यांना त्यांचे तिकीटही रद्द करावे लागते. याचे दोन तोटे आहेत, पहिला रेल्वे तिकीट रद्द करण्याचे शुल्क आकारते आणि दुसरा इच्छित तारखेला कन्फर्म तिकीट उपलब्ध होईल की नाही याची शाश्वती नसते.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रेल्वेमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही प्रणाली योग्य नाही. ही प्रणाली बदलण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत आणि काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.