INS Vikrant
INS Vikrant  Sakal
देश

INS Vikrant : नौदलात उद्या दाखल होणार पहिली 'मेड इन इंडिया' विमानवाहू युद्धनौका; ही आहेत वैशिष्ट्ये

सकाळ डिजिटल टीम

INS Vikrant : भारतीय नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' उद्या म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ही विमानवाहू नौका नौदलाच्या सेवेसाठी सुपूर्द करणार आहेत. विक्रांत ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका असून, नौदलात याचा समावेश केल्याने भारताचा समावेशदेखील स्वतःची विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक यादीत सामील होणार आहे. आज आपण याच याची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.

कशी तयार झाली INS विक्रांत?

पहिली गोष्ट म्हणजे भारतीय बनावटीच्या INS विक्रांतमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वदेशी नाहीत. म्हणजेच यात वापरण्यात आलेले काही भाग परदेशातूनही आयात करण्यात आलेले आहेत. मात्र, यात वापरण्यात आलेले 76 टक्के भाग हे देशातील उपलब्ध संसाधनांचा वापर करून बनवण्यात आल्याचे नौदलाने म्हटले आहे. विक्रांतच्या बांधणीसाठी लागणारे युद्धनौकेचे स्टील भारतीय पोलाद प्राधिकरणाने (SAIL) तयार केले आहे. हे पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची (DRDL) मदतही घेण्यात आली आहे.

नौदलाच्या म्हणण्यानुसार या युद्धनौकेच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेल्या स्वदेशी गोष्टींमध्ये स्टील, 2500 किमीची इलेक्ट्रिक केबल, 150 किमीचे पाइप आणि 2 हजार व्हॉल्व्ह यांचा समावेश आहे. याशिवाय एअरक्राफ्ट कॅरिअरमध्ये समाविष्ट असलेले हुल बोट्स, एअर कंडिशनिंगपासून रेफ्रिजरेशन प्लांट्स आणि स्टेअरिंग पार्ट्सही देशातच बनवलेले आहेत. याच्या निर्मितीमध्ये भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BEL), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), किर्लोस्कर, L&T (L&T), Keltron, GRSE, Wartsila India आणि इतर अन्य उद्योजकांचा मोठा वाटा आहे. याशिवाय 100 हून अधिक मध्यम आणि लघु उद्योगांनी जहाजावरील स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्रीच्या निर्मितीसाठी मदत केली आहे.

INS विक्रांतची ही आहेत वैशिष्ट्ये?

1. कोचीन शिपयार्ड येथे बांधणी केलेल्या INS विक्रांतची लांबी 262 मीटर असून, रुंदी सुमारे 62 मीटर आहे. तर, उंची 59 मीटर आहे. युद्धनौकेमध्ये 14 डेक आणि 2,300 कंपार्टमेंट्स आहे. ज्यामध्ये 1,700 हून अधिक क्रू मेंबर राहू शकतात. यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिनची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय यात आयसीयूपासून वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांशी संबंधित सर्व सेवा उपलब्ध असणार आहेत. INS विक्रांतचे वजन सुमारे 40 हजार टन इतके असून, ते भारतात बनवलेल्या इतर एअरक्राफ्टपेक्षा जड आणि मोठे आहे.

2. INS विक्रांतचा कमाल वेग 28 ​​नॉट्स् म्हणजेच ताशी सुमारे 51 किमी इतका आहे. तर, याची सामान्य गती 18 नॉट्सपर्यंत म्हणजे 33 किमी प्रति तास आहे. ही नौका 7500 नॉटिकल मैल म्हणजेच 13,000+ किलोमीटरचे अंतर एकाच वेळी पार करू शकते.

3. ही युद्धनौका एकावेळी 30 विमाने वाहून नेऊ शकते. यामध्ये MiG-29K लढाऊ विमाने तसेच कामोव-31 अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टर्स, MH-60R Seahawk मल्टीरोल हेलिकॉप्टर आणि HAL द्वारे निर्मित प्रगत हलके हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. नौदलासाठी भारतात बनवलेले हलके लढाऊ विमान - LCA तेजस देखील या विमानवाहू नौकेतून सहज टेक ऑफ करू शकते. याशिवाय परदेशात बनवलेल्या बोइंग आणि लॉकहीड मार्टिनच्या इतर विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी विक्रांतवर लवकरच चाचण्या केल्या जातील, असे मानले जात आहे.

सध्या फक्त पाच ते सहा देशांकडे विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता आहे. आता भारतही या श्रेणीत सामील झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारताने विमानवाहू युद्धनौका तयार केल्याने नौदल क्षेत्रात भारतची क्षमता अधोरेखित झाली आहे. किंबहुना, यापूर्वीही भारताकडे विमानवाहू युद्धनौका होत्या. पण त्या ब्रिटिश किंवा रशियन होत्या. भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्य ही सोव्हिएत काळातील युद्धनौका असून, 'अॅडमिरल गोर्शकोव्ह' ही भारताने रशियाकडून खरेदी केली होती.

पहिल्या युद्धनौकेचे नावही होते INS विक्रांत

गंमतीचा भाग म्हणजे भारतात बनलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नाव INS विक्रांत ठेवण्यात आले आहे. याआधी ब्रिटनकडून खरेदी केलेल्या भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नावही INS विक्रांत होते. दरम्यान, भारतात नव्याने निर्मिती केलेल्या युद्ध नौकेला तेच नाव देण्यामागे भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेबद्दल प्रेम आणि अभिमानाची भावना असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT