Iqbal Kaskar 
देश

Money laundering Case: इकबाल कासकरला सात दिवसाची ईडी कोठडी

इकबाल कासकार याला ईडीने ताब्यात घेतलं यानंतर ईडीने त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केलं.

सकाळ डिजिटल टीम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इकबाल कासकार याला ईडीने (ED) ताब्यात घेतलं आहे. यानंतर ईडीने त्याला विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर केलं. PLMA कोर्टाने इक्बाल कासकरला ७ दिवसाची म्हणजेच २५ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.

इक्बालचे वकिल सुलतान खान यांनी इक्बाल हा अनेक आजारांनी त्रस्त असून कस्टडीत त्यांना वैद्यकिय औषध आणि घरचं जेवण देण्यात यावे. अशी मागणी केली. न्यायालयाने त्याला परवानगी दिली. दरम्यान न्यायाधीशांनी त्याला प्रश्न विचारले. सत्र न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी इकबाल कासकरला (Iqbal Kaskar) त्याचं नाव विचारल्यानंतर ईडीच्या कस्टडीत काही प्रॉब्लेम आहे का असा प्रश्न विचारला. यावेळी इकबाल कासकरने नाही असं उत्तर दिलं.

ईडीने (ED) दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याची चौकशी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर इकबाल कासकरला ईडीने ताब्यात घेतले

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. याच प्रकरणी ईडीने 2 बिल्डरांना समन्स पाठवले असून, त्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Satara News: सातारकरांचाही परदेशी ओढा! जिल्ह्यात आंतरराष्‍ट्रीय वाहन परवाना मागणीत वाढ; प्रादेशिक कार्यालयातून तब्‍बल १३३ जणांची प्रक्रिया..

Video Viral: अरर... मुंबई इंडियन्सचा फॅन स्टेडियममध्ये गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला, पण अंगठीच हरवली अन् फजिती झाली

ही होती पहिला किसिंग सीन देणारी भारतीय अभिनेत्री; दिग्दर्शक नवऱ्याला फसवून सिनेमाच्या हिरोसोबत गेली पळून

झी मराठीच्या 'लक्ष्मीनिवास' आणि 'सावल्याची जणू सावली' मालिकांची वेळ बदलणार; कधी पाहता येणार? प्रेक्षक मात्र नाराज

SCROLL FOR NEXT