Navratri 2022 esakal
देश

Navratri 2022 : वैष्णवदेवीच्या भक्तांसाठी IRCTC ची खास भेट, दोन स्पेशल ट्रेन

नवरात्रीनिमित्त वैष्णव देवीला जाणाऱ्या भक्तांसाठी २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान दोन भारत गौरव टूरिस्ट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

IRCTC News : पुढच्या आठवड्यात नवरात्रोत्सव सुरू होत आहे. याकाळात आदिशक्तीच्या विविध शक्तीपिठांच्या दर्शनासाठी भक्त जातात. यातही वैष्णव देवीला जाणाऱ्या भक्तांचा ओघ मोठा असतो. हेच लक्षात घेऊन IRCTC कडून २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान दोन भारत गौरव टूरिस्ट ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. या पाच दिवसांच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना उत्तम सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

या मिळतील सुविधा

  • यात आधुनिक किचन कारद्वारा प्रवाशांना चविष्ट शाकाहारी जेवण पुरविण्यात येईल.

  • ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मनोरंजन व प्रवासाच्या माहिती देण्यासाठी इन्फोटेन्मेंट सिस्टम लावण्यात आली आहे.

  • स्वच्छ स्वच्छतागृह, सुरक्षा गार्ड व बोगीत सीसीटिव्ही कॅमेरे पण लावलेले असणार.

  • या रेल्वे प्रवासाच्या टूर पॅकेज च्या किमतीत बऱ्याच सुविधा दिल्या आहेत.

  • पर्यटन स्थळांसाठी बस सुविधा

  • राहण्यासाठी हॉटेलची सुविधा

  • गाईड

  • इंशोरन्स

  • शिवाय सरकारी किंवा पीएसयूचे कर्मचारी या प्रवासासाठी एलटीसी सुविधाही घेऊ शकतात.

कसे करावे बुकिंग?

याचे बुकिंग सुरू झाले आहे. इच्छूक प्रवासी https://www.irctctourism.com या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन बुकिंग करू शकतात. बुकिंग सुविधा केवळ अधिकृत संकेतस्थळावर उपल्ब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्रधान्य तत्वावर ते दिले जात आहे.

कुठून निघणार ट्रेन?

दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान संध्याकाळी ७ वाजता भारत गौरव पर्यटक ट्रेन कटरा साठी निघेल. या ट्रेनसाठी गाजियाबाद, मेरठ, मुजफ्फरनगर, सहारनपूर, अंबाला कँट, सरहिंद व लुधियाना या ठिकाणांहून देखील प्रवासाला सुरूवात करता येईल. जर पठाण कोटला ५० प्रवासी असतील तर तेथे याचा विशेष स्टॉप करण्यात येईल.

किती आहे खर्च?

वैष्णव देवीची ४ दिवस ५ रात्रींच्या प्रवासाच्या पॅकेजचा खर्च प्रत्येकी १३ हजार ७९० रूपये आहे. जर दोन जणांचे एकत्र तिकीट घेतले तर प्रत्येकी ११ हजार ९९० रूपये शुल्क लागेल. तर ५ ते ११ वर्षा दरम्यान वयोगटातील मुलांसाठी १० हजार ७९५ रूपये शुल्क निर्धारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

SCROLL FOR NEXT