IRCTC News esakal
देश

IRCTC News : पैसे न भरता बुक करता येणार रेल्वेचं तिकीट, सणासुदीचं प्रवाशांना गिफ्ट

प्रवाशांसाठी नवीन योजना लागू केली आहे. यामध्ये प्रवास आधी करून तिकीटाचे पैसे नंतर भरता येणार आहे. सहा महिन्याच्या कालावधीत पैसे भरता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

IRCTC News : सणावाराच्या काळात रेल्वे प्रवासाकडे प्रवाशांचा ओघ वाढतो. अशावेळी तिकीट बुकींगवर खूप ताण येतो. महिनोंन् महिने प्रवाशांना तिकीट मिळणं कठीण होतं. अशावेळी जास्तीच्या गाड्या सुरू करणं, इतर विविध योजना भारतीय रेल्वेकडून काढल्या जातात. त्यातच दिवाळीसाठी प्रवाशांना एक खास गिफ्ट देण्यात आलं आहे.

या योजनेत प्रवाशांना प्रवास आधी करून तिकीटाचे पैसे नंतर भरता येणार आहे. सहा महिन्याच्या कालावधीत पैसे भरता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येतात. या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने नवीन सुविधा सुरू केली आहे.

'ट्रॅव्हल नाऊ ॲण्ड पे लेटर' अशा या नव्या खास सुविधेचे नाव आहे. 'Travel Now Pay Later' ची सुविधा देण्यासाठी IRCTC ने CASHe सोबत भागिदारी केली आहे. अनेकदा लोकांना आपात्कालीन परिस्थितीत तिकिट बुक करावी लागते. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा स्थितीत 'Travel Now Pay Later' चा वापर करता येईल.

काय आहे योजना?

  • या नव्या खास सुविधेनुसार, प्रवाशांना एकही पैसा न देता तिकीट बुक करता येणार आहे. या प्रवासाचे पैसे नंतर देता येणार आहे.

  • ही सुविधा IRCTC च्या रेल कनेक्ट ॲपवरही उपलब्ध आहे.

  • या नव्या सुविधेमुळे तुम्ही EMI चा पर्याय निवडून तिकीट बुक शकता.

  • CASHe च्या माध्यमातून 'Travel Now Pay Later' साठी साधारण आणि तात्काळ तिकीट बुक करू शकता.

  • तिकीटासाठीची रक्कम ही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हप्त्याने भरू शकतात.

  • या सु्विधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Winter Storm Warning : ५ दिवसांचे रेशन-पाणी साठवून ठेवा! अमेरिकेत 'विंटर स्टॉर्म वॉर्निंग' जारी; ताशी ६० किमी वेगाचे बर्फाळ वारे अन् १६ इंच बर्फवृष्टीचा मोठा इशारा!

लोकसभेत २७० खासदार वाढणार; सरकारी तिजोरीवर किती कोटींचा बोजा पडणार? पगारापासून घरांपर्यंतचा खर्च वाचा

Kombdi Palali Song Story Bharat Jadhav : 'कोंबडी पळाली' गाण्याच्या शूटसाठी पैसेच नव्हते! भरत जाधवने चक्क घरून पैसे आणले अन्... केदार शिंदेंनी सांगितला 'जत्रा'च्या काळातील भन्नाट किस्सा!

Latest Marathi News Live Update: जाणून घ्या देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

Crime News: झेड प्लस सुरक्षा असली तरी वाचणार नाहीस; १० कोटी दे, नाहीतर यमराजाला भेटशील!

SCROLL FOR NEXT