नीमच : तुझे नाव मोहम्मद आहे का? असा प्रश्न विचारत आधार कार्ड (Adhar Card) दाखवण्यासाठी एका ज्येष्ठ वृद्धाला जबर मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, मारहाण करण्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. यानंतर मोठी खळबळ उडाली असून, मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी (Metal Ill) असल्याचे सांगितले जात आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील नीमच येथे घडला असून, मारहाण करणारी व्यक्ती मनसा भाजप नगरसेविकेचा पती असल्याचे समोर आले आहे. (Madhya Pradesh News)
भंवरलाल जैन (वय 60) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृतदेह मनसा येथे आढळून आला आहे. जैन हे रतलामच्या सरसी गावातील रहिवासी होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनसा भाजपच्या नगरसेविकेचा पती दिनेश कुशवाह जैन यांना मारहाण करताना आणि त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी करताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर, कुशवाह जैन यांना तुम्ही मुस्लिम आहे का? आणि तुमचे नाव मोहम्मद आहे का? असा प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी कलम 304 आणि 302 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
नेमकी घटना काय?
मनसा पोलीस स्टेशनचे प्रभारी केएल डांगी यांनी सांगितले की, “भंवरलाल जैन हे 18 मे रोजी कुटुंबासह चित्तौडगडला गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाला. दरम्यान, शुक्रवारी नीमच जिल्ह्यातील मनसा येथे त्यांचा मृतदेह आढळून आला तसेच त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सत्यता तापासण्यात येत असून, मारहाण होताना या घटनेचा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. घटनेनंतर आरोपी दिनेश कुशवाह हा फरार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
दरम्यान, घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी मध्य प्रदेशातील भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. "मध्यप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नसून आधार कार्ड न दाखवल्यामुळे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. मुस्लिम, दलित, आदिवासींनंतर आता जैनांवर हल्ले होत आहे. यामुळे मध्य प्रदेशात कोणीही सुरक्षित नसल्याचे काँग्रेसचे आमदार जितू पटवारी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.