jack dorsey esakal
देश

Jack Dorsey | जॅक डाॅर्सी यांनी ट्विटर बोर्ड सदस्यत्वाचा दिला राजीनामा

ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डाॅर्सी यांनी ट्विटर संचालक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डाॅर्सी (Jack Dorsey) यांनी ट्विटर संचालक मंडळाच्या (बोर्ड) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोर्सी पुन्हा ट्विटरचे सीईओ होतील अशी चर्चा सुरु होती. मात्र त्यांनी या अफवांना पूर्ण विराम देऊन पुन्हा ट्विटरचा (Twitter) सीईओ म्हणून परतणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. मायक्रो ब्लाॅगिंग साईटची डोर्सी यांनी २००६ मध्ये स्थापना केली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी सीईओपदाची सूत्रे भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांच्याकडे सुपुर्द केले. सीईओपद सोडल्यानंतर कंपनीने सांगितले होते, की जॅक कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत संचालक मंडळाचे सदस्य राहतील. त्यांचा २५ मे रोजी कार्यकाळ संपला. त्यानंतर संचालक मंडळाच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत डोर्सी यांनी पुन्हा निवडणुकीत भाग घेतला नाही. (Jack Dorsey Step Down From Twitter Board, Elon Musk Take Over Decision)

सीईओ व्यतिरिक्त जॅक डोर्सी हे कंपनीचे २००७ पासून संचालक होते. कंपनीच्या संचालक मंडळावर पहिल्यांदाच स्थापनेपासून ट्विटरचे सहसंस्थापकांपैकी कोणी नसणार असे ब्लूमबर्गने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

वार्षिक बैठकीदरम्यान गुंतवणुकदारांनी खासगी समभाग कंपनी सिल्व्हर लेकस् ईगाॅन डर्बन विरोधात मतदान केले. डर्बन ही मस्कची सहयोगी कंपनी आहे, असे वृत्त राॅयटर्सने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT