Jagdeep Dhankar 
देश

Jagdeep Dhankhad : इंग्रजी बोलणारा गावातला पहिला मुलगा बनला आज उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती झालेले एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर हे झुंझुनूच्या किठाना गावचे सुपुत्र आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड हे झुंझुनूच्या किठाना गावचे सुपुत्र आहेत. मात्र अजूनही ते या गावासोबत जोडले गेलेत. धनखड यांच्या या मुळ गावात प्रवेश करताच त्यांचे फार्म हाऊस पहायला मिळते. येथील महिलासांठी धनखड त्यांच्या पत्नीने 2008 साली मोफत शिवणकाम प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे आणि यासाठी महिलांची येथे सातत्यानं गर्दी पहायला मिळते.

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून धनखड हे सत्ताधारी एनडीएचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी घोषित केली आहे. इतर अनेक विरोधीपक्षही अल्वा यांना पाठिंबा दिला असला तरी धनखड यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, त्याकाळी धनखड यांनी गावातील लहान मुलांसाठी इंग्रजीचे शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. यासह संगणकाचे शिक्षण देणारा अभ्यासक्र सुरू केला असून वाचनालये बांधली आहेत. हे सगळे काम सध्या त्यांच्या पत्नी पाहत आहेत. या कामासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना फोनवरून संपर्क करतात. येथे शिवणकाम प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 15 वर्षात 2500 हून अधिक महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या या महिला स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येथील महिलांना या कामासाठी मोफत शिलाई मशीन दिली जातात. प्रशिक्षणादरम्यान महिलांना कापड आणि धाग्याचा कोणताही खर्च द्यावा लागत नाही.

इंग्रजीत बोलणारे धनखड हे गावातील पहिले व्यक्ती होते. गावातील प्रत्येक मुलाने विनाअडथळा इंग्रजी बोलयला आणि वाचायला शिकावे यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी येथे इंग्लिशच्या शिक्षणाचे आणि एकीकडे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यांनी बांधलेल्या वाचनालयात अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. गावाच्या मध्यभागी धनखड यांचा पूर्वजांचा वाडा (हवेली) आहे. येथे त्यांचे दोन भाऊ राहतात. कुलदीप, रणदीप आणि बहीण इंद्र यांचा सर्वांचा जन्म याच वाड्यात झाला आहे. 1989 मध्ये धनखर यांनी झुंझुनूमधून पहिली निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी याच हवेलीत राहून संपूर्ण निवडणुकीची रणनीती आखली होती.

जगदीप धनखड यांचे काका हरिबक्ष चौधरी हे अनेक वर्षांपासून सरपंच होते. या प्रदेशातील अनेक गावात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. धनखड यांचे वडील गोकुळ राम चौधरी हे रेल्वेत खात्यात मोठे कंत्राटदार होते. धनखड यांचे बालपण याच गावात गेले. त्यांची आई केसरदेवी आणि गोकुलराम चौधरी यांनी बराचवेळ या वाड्यात घालवला आहे. मात्र आता मागील बऱ्याच वर्षांपासून येथे कोणीही राहत नाही. या हवेलीतून बाहेर पडले की, एका गल्लीत ठाकूरजींचे मोठे मंदिर आहे. धनखड लहानपणी आईसोबत दररोज मंदिरात जात होते. यासंदर्भात पुजारी सज्जनदास यांनी सांगितले की, आजही ते गावात आले की, दिवसातून दोनदा या मंदिरात येतात आणि तासंतास एकटे बसून राहतात. गाव सोडताना ठाकुरजींना पाहूनच निघून जातात.

धनखड यांच्या पूर्वजांचे शेत गावापासून तीन किमी अंतरावर आहे. येथील सुमारे ६० एकर जमिनीत लागवड केली आहे. 2012 मध्ये धनखर यांनी येथे 9, 500 रोपे लावली होती. भाईसाहेबही शेतीकडे पूर्ण लक्ष देतात, अशी माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Protest March : गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप

Google Layoffs 2026: AI वर वाढता खर्च; ५ देशांतील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सत्ता मिळत नाही म्हणून कायदा बदलता का? गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक, कोरमचा मुद्दा उपस्थित करण्यावरून सरकारला सवाल

Ethanol Car: १००% इथेनॉलवर धावणारी Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती!

New Recharge Plan: फक्त ३५ रुपयांत दोन OTT प्लॅटफॉर्म! नवा रिचार्ज पाहून ग्राहकही थक्क, दिवाळीसाठी खास सुविधा काय?

SCROLL FOR NEXT