Jammu and Kashmir Crime News esakal
देश

काश्मिरात आणखी एका हिंदूची हत्या; दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरला घातल्या गोळ्या

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी (Terrorist) सातत्यानं लक्ष्य करत आहेत. आज (गुरुवार) कुलगाममध्ये (Kulgam District) दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर (Bank Manager) गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झालाय. विजय कुमार हा राजस्थानचा (Rajasthan) रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वी कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती.

खोऱ्यातील हिंदू नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अलीकडेच, बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट आणि कुलगाममध्ये महिला शिक्षिकेच्या हत्येविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. सर्व स्थलांतरित सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी तैनात करावं, अशी काश्मिरी पंडितांची मागणी होती.

दहशतवादी घटना पाहता बुधवारी, पंतप्रधानांच्या विशेष पॅकेज अंतर्गत जम्मू प्रशासनानं काश्मीरमध्ये तैनात असलेल्या स्थलांतरितांना आणि जम्मू विभागातील इतर कर्मचाऱ्यांना 6 जूनपर्यंत खोऱ्यातील सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेशही जारी केले होते. आदेशानुसार, काश्मीर विभागात पंतप्रधान पॅकेज अंतर्गत तैनात अल्पसंख्याक समुदायातील कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी पाठवलं जाणार आहे.

खोऱ्यात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

  • 31 मे - कुलगाममधील गोपालपोरा इथं दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.

  • 25 मे 2022 - काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.

  • 24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.

  • 17 मे 2022 - बारामुल्ला येथील एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले होते.

  • 12 मे 2022 - काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला.

  • 12 मे 2022- पुलवामा इथं पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

  • 9 मे 2022 - शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला, तर एका जवानासह दोघे जखमी झाले.

  • 2 मार्च 2022 - कुलगाममधील संदू इथं दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT