Students_Exam
Students_Exam 
देश

JEE Exam: कोरोनामुळे परीक्षा रखडणार? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी म्हणतात...

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्‍यक जेईई मेन्स परीक्षा पुढील वर्षी (२०२१) जानेवारीऐवजी फेब्रुवारीत घेण्याचा केंद्रीय पातळीवर गंभीरपणे विचार सुरू आहे. देशभरातील कोरोना परिस्थिती पाहून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोवीड १९ महामारीची स्थिती पुन्हा गंभीर बनल्याने जेईई परीक्षा नेहमीप्रमाणे जानेवारीत घेण्याचा विचार राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीई) रद्द करावा लागणार आहे. त्यातून यंदाच्या प्रवेशाची प्रक्रियाही कोरोनामुळे रखडली आहे. कोरोना लस कधी येणार याबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे सुरू आहेत. १३५ कोटींच्या लोकसंख्येला कोरोना लसीकरण ही साधी सोपी बाब नसणार हेही स्पष्ट आहे. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर अपरिहार्यपणे झाला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षाची परीक्षा फेब्रुवारीत वा प्रसंगी त्यापुढे घेतल्याने त्या विद्यार्थ्यांनाही फायदा होईल. ज्यांना यंदाच्या जेईईत समाधानकारक गुण मिळाले नाहीत किंवा त्यांना मिळालेल्या आयआयटी-महाविद्यालयांवर जे समाधानी नाहीत. कोरोना महामारीमुळे यावर्षीची जेईई प्रवेश प्रक्रियाही रखडल्याने पुढील वर्षी ती नेहमीपेक्षा उशिरा घेतली जाईल असे सांगितले जात आहे. पुढील वर्षीच्या जेईई मेन्सचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणीही विविध राज्यांनी केली आहे. एनसीईआरटीच्या परिषदेत दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही मागणी केली होती आणि तिला व्यापक पाठिंबाही मिळाला होता.

जेईई मेन्सचे स्वरूप
जेईई मेन्स परीक्षेत प्रत्येकी ४ गुणांचे एकूण ७५ प्रश्‍न विचारले जातात. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र व गणित या विषयांशी संबंधित ही चाचणी परीक्षा घेतली जाते. चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी एक गुण कापला जातो. ११ वी व १२ वीतील अभ्यासक्रमावर मुख्यतः जेईई परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका आधारित असतात.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT