jee mains and neet ug will not be merged into cuet till two years says dharmendra pradhan  
देश

NEET, JEE परीक्षांच्या विलीनीकरणाबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोटा भेटीदरम्यान येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी NEET, JEE चे CUET मध्ये विलीनीकरण करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही तणावाशिवाय प्रवेश परीक्षांची तयारी करावी, अशा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

यूजीसी प्रमुखांच्या तीनही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे विलीनीकरण करण्याच्या विधानाबाबत प्रधान म्हणाले की, जर असा मोठा बदल होणार असेल तर त्याची आधीच जाहीर घोषणा केली जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहावे. शिक्षक दिनानिमित्त, मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी कोटा येथील जवाहर नगर, अॅलन कोचिंगच्या सत्यार्थ कॅम्पसमध्ये या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशा तसेच देशातील इतर प्रांतातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रधान यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या संवादादरम्यान, विद्यार्थ्यांनी जेईई-मेन प्रमाणेत नीटसाठी देखील एका वर्षात दोन वेळा देण्याची परवानगी द्यावी सीयूईटी, जेईई आणि एनईईटीचे विलीनीकरण, प्रवेश परीक्षांमध्ये आरक्षण, प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विशेष अभ्यासक्रमाची पुस्तके यासारख्या प्रश्नांना प्रधान यांनी उत्तर दिले.

प्रधान म्हणाले की, विद्यापीठ प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET), वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) आणि अभियांत्रिकी प्रवेशांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) विलीन करण्याचा तत्वतः निर्णय घेणे बाकी आहे. त्यांनी स्पष्ट केलं की सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव नाही, हे पुढच्या वर्षीही होणार नाही, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. आम्ही करू, तेव्हा फार पूर्वी नोटीस देऊन करू, असे ते म्हणाले. किमान दोन वर्ष तरी कंबाइंड टेस्ट घेतली जाणार नाही, तुम्ही निश्चित होऊन अभ्यास करा असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणाला नव्या रचनेत सामावून घेण्याचा विचार मांडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क सिटीझन सर्व्हेमध्ये पुस्तक कसे असावे हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की कोटामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सिटीझन फ्रेमवर्क सर्व्हेवर जावे आणि अभ्यासक्रम कसा असावा याविषयी त्यांच्या सूचना द्याव्यात. तुमच्या सूचनांचा शासन विचार करेल आणि शैक्षणिक धोरण खूप मजबूत होईल, असे ते म्हणाले.

प्रधान म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या पुनर्रचनेत मैलाचा दगड ठरेल. शालेय शिक्षण नव्या रचनेत आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार डिजिटल विद्यापीठ निर्मितीवर काम करत आहे. येत्या काही दिवसांत डिजिटल युनिव्हर्सिटी सुरू होत आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक प्रकारचे कोर्सेस करता येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षेतील अनियमिततेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, परीक्षेची भीती असते. तंत्रज्ञान जसजसे प्रभावी होईल तसतसे आम्ही चुका कमी करू. परीक्षेत चांगल्या प्रकारे परीक्षा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT