Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka Election : कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण? हायकमांडच्या निर्णयाआधीच फडणवीसांनी जाहीर केलं नाव

Balkrishna Madhale

कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मार्च रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप हायकमांडनं अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब केलंय.

फडणवीस म्हणाले, 'मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) पुढील टर्ममध्येही सरकारचं नेतृत्व करतील.' विजयपुरा इथं पत्रकार परिषदेला संबोधित करताना फडणवीस यांनी बोम्मईंबाबत हे वक्तव्य केलंय.

फडणवीस पुढं म्हणाले, 'निवडणुकीत भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळणार आहे. पुढील सरकारचं नेतृत्व बोम्मईच करतील यात शंका नाही. बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक निवडणुकीला सामोरे जात असल्याचं अमित शहा (Amit Shah) यांनी दोन वर्षांपूर्वी सांगितलं होतं. ते पुढील कार्यकाळासाठी या पदावर कायम राहतील, असं सांगत फडणवीसांनी आपल्या वक्तव्याचा बचाव केला.

फडणवीसांच्या विधानावर भाजपचे प्रदेश नेते म्हणाले, "हा कर्नाटकचा प्रश्न आहे. भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील नेत्यांचं मत जाणून घेतं आणि त्यानुसार कार्य करतं. फडणवीस यांच्या मताचा यापूर्वी अनेकदा आदर केला गेला आहे." मात्र, बेळगाव (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील यांनी वेगळंच विधान केलंय. ते म्हणाले, परिस्थितीनुसार पक्षाचं हायकमांड मुख्यमंत्र्यांची निवड करेल. जे नाव सर्व आमदारांना मान्य असेल. पाटील यांनी 2008 आणि 2013 मध्ये दोनदा बेळगावी ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. फडणवीस यांनी बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी कशी जाहीर केली हे मला माहीत नसल्याचंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भाजपच्या महाराष्ट्र युनिटचा कर्नाटकातील मराठी भाषिकांना पाठिंबा आहे. पक्ष त्यांच्या राजकीय कारभारात हस्तक्षेप करणार नाही. महाराष्ट्र भाजपनंही ज्या मतदारसंघात महाराष्ट्र समर्थक संघटना महाराष्ट्र एकीकरण समितीनं (एमईएस) उमेदवार उभे केले आहेत, तिथं प्रचार न करण्याचा निर्णय घेतलाय.''

महाराष्ट्र भाजप सदैव कर्नाटकात मराठ्यांच्या पाठीशी उभी राहील. मात्र, राजकारणाचा विचार करता इतर मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आम्ही तटस्थ राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मार्च रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT