BJP Kumar Bangarappa vs Congress Madhu Bangarappa Soraba Constituency esakal
देश

Karnataka : वडिलांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्रिपद भूषवलं; आता सख्ख्या भावांनीच एकमेकांविरुद्ध ठोकला 'शड्डू'

सोरब मतदारसंघातून भावंडे पहिल्यांदा समोरासमोर ठाकले नाहीत, तर यापूर्वी त्यांच्यात लढत झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यामध्ये 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोरब मतदार संघातून भाजप उमेदवार कुमार भंगारप्पा यांनी बाजी मारली.

Karnataka Assembly Election 2023 : सोरब विधानसभा मतदारसंघात (Soraba Constituency) मोठ्या भावाविरुद्ध लहान भावाने शड्डू ठोकला आहे. भाजपने (BJP) कुमार बंगाराप्पा यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेस (Congress) उमेदवारीवर त्यांचे बंधू मधू बंगाराप्पा (Madhu Bangarappa) यांना आखाड्यात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे सख्खी भावंडे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीवर समोरासमोर ठाकली आहेत. यामुळे सोरब मतदारसंघातील लढत राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यामध्ये 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोरब मतदार संघातून भाजप उमेदवार कुमार भंगारप्पा यांनी बाजी मारली. यामुळे या निवडणुकीत पक्षाने परत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कॉंग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे लक्ष लागून होते. अंतिम टप्प्यात कॉंग्रेसतर्फे कुमार बंगाराप्पा यांचे बंधू मधु बंगाराप्पा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सख्खी भावंडे सोरब संघात समोरासमोर ठाकली आहेत.

सोरब मतदारसंघातून भावंडे पहिल्यांदा समोरासमोर ठाकले नाहीत, तर यापूर्वी त्यांच्यात लढत झाली आहे. त्यात 2013 मध्ये केवळ एकदा मधू बंगारप्पा यांनी येथून विजय मिळविला आहे. कुमार बंगाराप्पा एका पक्षात राहिले आहे तर त्यांचे कुटुंब हे बंधू मधू बंगारप्पा यांच्यासोबत राहिले आहे. कुमार बंगारप्पा 1999 ते 2013 पर्यंत कॉंग्रेस पक्षात होते. मात्र, 2018 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकली. यामुळे दुसऱ्यांदा भाजपच्या उमेदवारीवर कुमार बंगाराप्पा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात मधू बंगाराप्पा कॉंग्रेस उमेदवारीवर आखाड्यात आहेत.

एस. बंगाराप्पा लोकप्रिय नेते

एस. बंगाराप्पा यांनी राजकीय वर्तुळात आपला ठसा उमटविला होता. आमदार, मंत्री, मुख्यमंत्रिपद भूषविले. 40 वर्षे राजकीय वर्तुळात चर्चेत राहिले. त्यामुळेच सोरब विधानसभा मतदारसंघाचे नाव घेण्यात आल्यावर माजी मुख्यमंत्री एस. बंगाराप्पा यांचे स्मरण होते. त्यांची मुले कुमार बंगाराप्पा व मधू बंगाराप्पा गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीवर आखाड्यात आहेत.

उमेदवारी अर्जाबाबत

  • दाखल अर्ज 18

  • वैध अर्ज 18

  • अर्ज माघार 8

  • रिंगणातील अर्ज 10

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT