Karnataka Assembly Election esakal
देश

Karnataka : ..तर काँग्रेस घालणार महिला आमदाराच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

बेळगांव : निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चांगलीच जुंपलीये. त्यातच आता दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत दावे-प्रतिदावे सुरु आहेत.

मात्र, असतानाच मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस नेत्यानं मोठ वक्तव्य केलंय, त्यामुळं काँग्रेस महिलेला कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या (Karnataka CM) खुर्चीवर बसवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

महिलांना राजकीय शिडी वेगानं चढणं तितकं सोपं नाही. मात्र, भविष्यात कर्नाटकात महिलेला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदावर पाहण्याची आपली इच्छा आहे, असं बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी म्हटलंय.

एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर मतं व्यक्त केली. कर्नाटक राजकारणात उत्तम नेतृत्त्वगुण असणाऱ्या अनेक महिला नेत्या आहेत. काँग्रेसमध्येही अनेक सामर्थ्यवान महिला नेत्या आहेत. भविष्यात महिला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पाहण्याची त्यांची इच्छा आहे, असं त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहात का? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, अजून वाटचाल करायची आहे. बरीच कामं करायची आहेत, मी लांबउडी टाकायला जाणार नाही. संथ आणि स्थिर विकासावर माझा विश्वास आहे, असं हेब्बाळकर यांनी स्पष्ट केलं.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मे 2018 मध्ये इथं विधानसभेची शेवटची निवडणूक झाली होती. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसनं 80 आणि जेडीएसनं 37 जागा जिंकल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

Black Magic Incident : मंचर स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; अंधश्रद्धेचे काळे सावट कायम

Nicolas Sarkozy: फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझींना ५ वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

SCROLL FOR NEXT