राजन व त्याची पत्नी अंबिली दोन मुलांसह. 
देश

केरळ सरकारने घेतले निराधार मुलांना दत्तक

अजय कुमार

तिरुअनंतपुरम - सार्वजनिक जमिनीवर उभारलेल्या झोपडी सोडण्यासाठी वेळ देण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करीत पोलिसांनी धमकी दिल्याने जिवंत जाळून घेतलेल्या दांपत्याच्या दोन मुलांना केरळ सरकारने दत्तक घेतले आहे. या मुलांचा शाळेचा संपूर्ण खर्च सरकार करणार असून वादग्रस्त जागेवर त्यांना नवे घर बांधून देणार असल्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंगळवारी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही घटना  अथियाबनिओर पोंगील येथे घडली. यात राजन (वय ४७) व त्याची पत्नी अंबिली यांचे मेडिकल कॉलेज रुग्णालयात सोमवारी (ता. २८) निधन झाले. हे दांपत्य व त्यांची रणजित व राहुल ही मुले एका सार्वजनिक जागेत राहत होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वसंता या महिलेने ही जागा तिच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. तिने त्यांना घराबाहेर काढण्यासाठी नोटीसही न्यायालयाकडून आणली होती. यावर राजनने स्थगिती मिळविली होती. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत या कुटुंबाला घराबाहेर काढण्यासाठी दमदाटी केली.

भुकेल्यांना अन्नदान
राजन हा सुतारकाम करीत असे. अंबिली ही मतिमंद होती. रस्त्यावर भुकेल्या गरिबांना अन्नदान करीत असे. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार यापुढेही भुकेल्यांना अन्न खाऊ घालणार असल्याचे रणजित व राहुल यांनी सांगितले. मात्यापित्याचे छत्र हरविलेल्या रणजित व राहुल यांना अनेक सामाजिक संस्था, युवक काँग्रेसने घर देण्याची तयारी दाखविली आहे. 

अशा प्रकारच्या परिस्थितीत कशी हाताळायची याचे प्रशिक्षण पोलिस अधिकाऱ्यांना देण्याचे महत्त्व यातून अधोरेखित होत आहे. गरिबांबद्दलची दया आणि वास्तवाचे भान ठेवल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात.
- शशी थरुर, खासदार, काँग्रेस

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT