Firing 
देश

वीस लाखांसाठी ‘दहशतवाद्यां’ना मारले

पीटीआय

शोपियाँ (काश्‍मीर) - काश्‍मीरमध्ये गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या तथाकथित बनावट चकमकीत सहभागी असलेल्या लष्कराच्या एका कॅप्टनने वीस लाखांचे इनाम जिंकण्यासाठी दोन स्थानिक नागरिकांशी संगनमत करून तीन युवकांना ठार मारल्याचे पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील कॅप्टन भूपिंदर सिंग हा सध्या लष्कराच्या तुरुंगात असून त्याच्याविरोधात कोर्ट मार्शल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजौरी जिल्ह्यातील इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि महंमद इबरार या तीन युवकांना शोपियाँ जिल्ह्यातील अमशीपुरा येथे गेल्या वर्षी १८ जुलैला चकमकीत मारण्यात आले होते. ते दहशतवादी होते, असे सांगण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी शोपियाँच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या आरोपपत्रात ताबिश नाझीर आणि बिलाल अहमद लोन यांच्या भूमिकेबाबतही माहिती देण्यात आली आहे. यातील, माफीचा साक्षीदार बनलेल्या बिलाल लोन याने कबुली जबाब न्यायाधीशांसमोर दिला आहे. 

मारले गेलेले युवक हे दहशतवादी नसल्याबाबतची माहिती सोशल मीडियातून प्रसिद्ध झाल्यावर लष्कराने विशेष समितीमार्फत चौकशी केली. या समितीच्या अहवालानुसार, या प्रसंगी लष्कराने अधिकारांचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पोलिसांनी आरोपपत्रात ७५ साक्षीदारांची नावे आणि युवकांनी मोबाईलवरून केलेल्या संभाषणाची माहितीही सादर केली आहे. तसेच, कॅप्टन सिंग यांच्या पथकात असलेल्या चार जवानांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांचे पथक आणि दोन स्थानिक नागरिक संबंधित ठिकाणी आले. ठिकाणाला वेढा घालण्यासाठी जवान जात असतानाच त्यांना गोळीबाराचे आवाज ऐकू आले. नंतर कॅप्टन सिंग यांनी, पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या तीन दहशतवाद्यांना मी मारले, असे सांगितले. 

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न 
कॅप्टन आणि दोन स्थानिक नागरिकांनी पुरावेही नष्ट केले. दहशतवाद्यांना मारल्याबद्दल मिळणाऱ्या वीस लाख रुपयांच्या इनामावर डोळा ठेवून त्यांनी हा कट केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. आरोपींनी पोलिसांनाही चुकीची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : संघाच्या बालेकिल्ल्यात MIM-मुस्लिम लीगचा धक्का, १३ उमेदवार विजयी! संभाजीनरमध्ये भाजपनंतर नंबर २ चा पक्ष

Kolhapur Accident : गडहिंग्लज-चंदगड मार्गावर भीषण अपघात; दोन मोटारींचा चक्काचूर, नवजात बाळासह पाच जण जखमी

Ahilyanagar Election Result: अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीने जिंकल्या सर्वाधिक जागा; वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

Aamir Khan Health: डोकेदुखीसाठी सुरु केलेल्या डाएटने आमिर खानचं वजन झालं कमी; विद्या बालनही फॉलो करायची सेम प्लॅन

Bhiwandi Election Result: काँग्रेसच्या आघाडीवर शिवसेना-भाजपची लढत! पाहा भिवंडी-निजामपूर मतदारसंघामधील विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT