Sanjay Pande Mumbai CP
Sanjay Pande Mumbai CP File Photo
देश

IPS अधिकारी रडारवर? आता दिल्लीतून सूत्र हलणार, सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

ओमकार वाबळे

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अखेर न्यायालयीन सुनावणीत राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. (Kirti Somaiya Leaves for Delhi to meet Home Secretary Ajay Bhalla)

मात्र, या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली. किरीट सोमय्यांच्या रुपाने हा वाद आणखी चिघळला आहे. हल्ला झाल्यानंतर सोमय्यांनी थेट दिल्ली गाठली. याआधी देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात कॉल झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा अमित शाहांनी घेतला.

सोमय्यांनी गृहसचिवांसोबत झालेल्या भेटीनंतर पुढच्या दोन दिवसात दिल्लीतून केंद्र सरकारचं पथक चौकशीला येणार असल्याचं सांगितलं. यामुळे गृहसचिवांच्या भेटीनंतर मुंबईचे पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Mumbai CP Sanjay Pande)

सोमय्या यांनी राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चपलांचा पाऊस बरसवला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. (Kirit Somaiya Attacked in Mumbai)

दिल्लीत पोहोचून त्यांनी गृहसचिवांना राज्यातील हल्ल्याची सात उदाहरणं दिली. मुंबईत शिवसैनिकांकडून झालेल्या दगडफेकीला पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. या आयपीएस अधिकाऱ्याची दिल्लीतून चौकशी व्हावी, ही मागणी सोमय्यांनी केलीय. हा अधिकारी पदाचा गैरवापर करत आहे, असं ते म्हणाले.

माझ्यावर हल्ला झालेले सीसीटीव्ही फूटेज गायब करण्यात आले, असं सोमय्या म्हणाले. केंद्र सरकारने या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. दोन दिवसात दिल्लीतून स्पेशल टीम मुंबईत जाणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिलीय. मी न दाखल केलेली एफआयर माझ्या नावाने दाखवली जात आहे. संजय पांडे हे उद्धव ठाकरेंचे पर्सनल सिक्युरीटी गार्ड आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT