कुंभमेळा २०२१ शाही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह लाखो भाविक आज गंगा नदीवर दाखल झाले होते.
देश

दोन दिवसांत कुंभमेळ्यात एक हजार ‘पॉझिटिव्ह’ !

कोरोनाकाळातही कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते

नामदेव कुंभार

हरिद्वार (उत्तराखंड) : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव समजल्या जाणाऱ्या येथील कुंभमेळ्यात बुधवारी तिसरे शाही स्नान परंपरागत पद्धतीने उत्साहात साजरे झाले. कोरोनाकाळातही कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते. प्रचंड गर्दीमुळे येथे कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, गेल्या ४८ तासांत एक हजाराहून भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दुसरीकडे तिसऱ्या शाही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह लाखो भाविक आज गंगा नदीवर दाखल झाले होते. यातील बहुतेक जण मास्कविनाचा होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतराच्या नियमाची पायमल्ली झाली. मोठे व प्रतिष्ठित आखाडे शाही मिरवणूक काढत हर की पौडी घाटावर पोहोचत होते. सर्वांत आधी पंचायती आखाडा निरंजनी आणि त्याच्या सहयोगी आखाड्यांनी स्नान केले. त्यानंतर जुना आखाड्याचे स्नान झाले. सकाळी साडेआठपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत सर्व १३ आखाड्यांसह दहा लाखांपेक्षा अधिक भाविकांना गंगेत स्नानाचा लाभ घेतला. पुढील शाही स्नानाची पुढील पर्वणी येत्या २७ रोजी आहे.

गर्दीमुळे कारवाई अशक्य

कमी गर्दीच्या घाटांवर सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. पण मुख्य घाटांवर भाविकांची झुंबड उडाल्याने अशी कारवाई करणे अशक्य झाले होते, अशी कबुली पोलिस अधिकारी संजय गुंजाळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

कुंभमेळ्याच्या सांगतेसाठी चर्चा

कोरोनाची दुसरी लाट देशभरात पसरली असून ती अधिक घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी हरिद्वार येथील कुंभमेळातील गर्दी बिलकूल कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये काल कोरोनाचे एक हजार ९२५ लोक बाधित आढळले होते. हरिद्वारमध्ये दोन दिवसांत एक हजार लोकांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन शक्तिशाली आखाडे व संत-महात्म्यांच्या गटांशी चर्चा करीत आहे. त्यांनी आज शेवटचे स्नान करून हरिद्वार सोडावी, अशी विनंतीही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : १०० टक्के इथेनॉल इंधन कुठून येणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Ratnagiri Alphonso Mango : दिवाळीत चाखायला मिळणार हापूस! रत्नागिरीतील गावखडीत ऑक्टोबरमध्येच आंब्याची पहिली पेटी तयार; 21 हजार रुपयांचा दर अपेक्षित

Rahul Gandhi: ‘राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या’; राहुल गांधींचे महारॅलीसाठी देशवासीयांना आवाहन

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

Crop Loss Compensation : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात जमा होणार 2500 रुपये; सरकारचा अधिकृत आदेश जारी, 50 लाख शेतकऱ्यांना लाभ अपेक्षित, 17 अटी लागू

SCROLL FOR NEXT