rath yatra
rath yatra 
देश

रथयात्रेला परवानगी दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला कधीच माफ करणार नाही- सर्वोच्च न्यायालय

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : कोरोना महामारीने देशभरात हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ओडिसातील भगवान जगन्नाथाच्या पुरी रथयात्रेला परवानगी नाकारली आहे. याप्रकरणी  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने गुरुवारी यावर सुनावणी केली असून रथयात्रेला परवानगी दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला कधीच माफ करणार नाहीत असं म्हटलं आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी हे गंभीर प्रकरण असून याला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. 

रथयात्रेच्या ठिकाणी दहा लाखांपेक्षा अधिक लोक जमा होतात. त्यामुळे या रथयात्रेला परवानगी नाकारली जावी, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती. याची दखल न्यायालयाने घेतली असून दहा हजार लोक जरी त्या ठिकाणी जमा होत असतील तर गंभीर गोष्ट आहे, असं बोबडे म्हणाले आहेत. 23 जूनपासून भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला सुरुवात होणार होती. हा उत्सव 20 दिवस साजरा केला जातो.

रथयात्रेसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे ही यात्रा थांबवण्यात यावी असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. तसेच जर सर्वोच्च न्यायालय  लोकांच्या आरोग्याची काळजी करत दिवाळीतील फटाक्यांवर बंदी घालू शकते, तर रथयात्रेवर बंदी का आणली जाऊ शकत नाही? असा सवाल याचिकेत करण्यात आला होता. 

कोरोना महामारीच्या काळात अशाप्रकारे लोक जमा होऊ शकत नाहीत. सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन या वर्षी रथयात्रेला परवानगी दिली जाऊ शकत नाही. लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा आदेश पारित करत आहोत, असं याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे ओडिशामध्ये आता रथयात्रा आयोजित केली जाणार नाही. तसेच यासंबंधी कोणतीही पूर्व तयारी केली जाणार नाही.

दरम्यान, ओडिशा सरकारने 23 जून रोजी निघणाऱ्या रथयात्रेसंबंधात कोणताही निर्णय घेतला नाही.  ओडिशा विकास परिषद नावाच्या एका एनजीओने पुरी रथयात्रा न भरवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT