Police Constable Love Affair esakal
देश

Love Affair : दोघांचं एकाच लेडी कॉन्स्टेबलवर जडलं 'प्रेम'; गोळीबार करत ठाण्यातच हाणामारी

दोघांनाही एकाच महिलेसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाल्यावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

सकाळ डिजिटल टीम

दोघांनाही एकाच महिलेसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाल्यावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

Police Constable Love Affair : महिला सहकाऱ्यासोबतच्या प्रेमसंबंधावरून दोन कॉन्स्टेबलमध्ये जोरदार वाद झाल्यामुळं पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज (SSP Satyarth Anirudh Pankaj) यांनी कॉन्स्टेबल योगेश चहल, एसएचओ यांच्यासह पाच पोलिसांना निलंबित केलंय. शिवाय, याबाबत अंतर्गत चौकशीचे आदेशही दिलेत.

मिळालेल्या वृत्तानुसार, बहेरी पोलिस स्टेशनमधील (Baheri Police Station) दोन कॉन्स्टेबल, ज्यांचं वय 20 इतकं आहे. त्यांचं एकाच महिला सहकाऱ्यावर प्रेम जडलं होतं. दोघांनाही एकाच महिलेसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाल्यावर, दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

पोलिस ठाण्यात गोळीबार

यापैकी मोनू कुमारनं सर्व्हिस रिव्हॉल्व्हर उचलून पोलिस ठाण्याच्या आत गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. यावर एसएसपी म्हणाले, "जर पोलिस कर्मचारी आपल्या सहकाऱ्यासोबत प्रेम करत असतील तर, ती त्यांची वैयक्तिक बाब आहे. यात काहीही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर नाही. केवळ निष्काळजीपणा आणि शिस्तभंगाच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आलीय."

असं जुळलं होतं प्रेम

मोनू कुमार हा पश्चिम उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील असून डिसेंबर 2019 मध्ये बहेरी पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहे. याच पोलीस ठाण्यात या वर्षी जानेवारी महिन्यात त्याच्या शेजारच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका महिला कॉन्स्टेबलची भरती झालीय. मोनू कुमार आणि लेडी कॉन्स्टेबल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. बहेरी स्टेशनवर तैनात होण्यापूर्वी ते गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते.

हवालदार चहललाही आवडायची लेडी कॉन्स्टेबल

दुसरा हवालदार योगेश चहल यालाही लेडी कॉन्स्टेबल खूप आवडायची. त्यानं मोनू आणि महिलेच्या नात्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. त्यामुळं वाद उफाळला. या प्रकरणात सामिल असलेल्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज कुमार यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT