Narendra Modi Amit Shah
Narendra Modi Amit Shah esakal
देश

3 जुलैपूर्वी भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; जाणून घ्या कोणाचं नाव आघाडीवर..

सकाळ डिजिटल टीम

या पदासाठी अनेक दावेदारांची नावं चर्चेत आली आहेत.

लखनौ : योगी सरकार-2.0 मध्ये (Yogi Government) स्वतंत्रदेव सिंह (Swatantra Dev Singh) यांना मंत्री करण्यात आल्यापासून सर्वांच्या नजरा आता भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांकडं (BJP state president) लागल्या आहेत. या पदावर कोणाची निवड होणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान, या पदासाठी अनेक दावेदारांची नावं चर्चेत आली आहेत. 2 आणि 3 जुलै रोजी तेलंगणामध्ये (Telangana) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असल्यानं आझमगड आणि रामपूर पोटनिवडणुकीनंतर लवकरच नवीन अध्यक्षांची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. भाजपमध्ये एक व्यक्ती, एक पद हे तत्त्व पाळलं जातं. या दृष्टिकोनातून स्वतंत्रदेव सिंह मंत्री होताच, आता त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी प्रदेशाध्यक्ष बनवायचं हे निश्चित झालंय.

पक्षानं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. अशा स्थितीत पक्षाला राज्यातील संघटनेची कमान अशा कार्यकर्त्याकडं सोपवायची आहे, ज्याच्या माध्यमातून जातीय-प्रादेशिक समीकरणंही सोडवता येतील. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुभवावरून 2024 मध्येही पक्ष जुना यशस्वी फॉर्म्युला स्वीकारून ब्राह्मणांना प्रदेशाध्यक्ष करेल, असा अंदाज बांधला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, माजी ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा, अलिगडचे खासदार सतीश गौतम आणि महेश शर्मा हे प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जातंय. संघाची पार्श्वभूमी असलेले प्रदेश उपाध्यक्ष दिनेश कुमार यांचं नाव आघाडीवर आहे. शिवाय, भाजप पुन्हा धक्कातंत्र वापरुन दलित चेहरा देखील देण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT