आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून त्यात व्हॉट्सॲप (WhatsApp) हे आपल्या सगळ्यासाठी अत्यावश्यक ॲप बनले आहे. व्हिडिओ कॉलपासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरकर्ते व्हॉट्सॲप वापरतात. मात्र मद्रास उच्च न्यायालयाच्या (madras high court) इतिहासात प्रथमच एका न्यायमूर्तींनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एखाद्या खटल्याची सुनावणी केली आणि ती देखील रविवारी.
न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन रविवारी नागरकोइल येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यांनी या प्रकरणावर तेथून सुनावणी केली, ज्यामध्ये अभिष्ट वरदराज स्वामी मंदिराचे वंशानुगत विश्वस्त पीआर श्रीनिवासन यांनी असा युक्तिवाद केला की, सोमवारी त्यांच्या गावात प्रस्तावित रथ महोत्सव आयोजित केला नाही, तर गावाला "दैवी क्रोध" सहन करावा लागेल. त्यामुळे ही सुनावणी घेण्यात आली
आपल्या आदेशाच्या सुरुवातीला उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 'रिट याचिकाकर्त्याच्या या कळकळीच्या प्रार्थनेमुळे मला नागरकोइलकडून तातडीची सुनावणी घ्यावी लागली आणि या प्रकरणाची व्हॉट्सॲपद्वारे सुनावणी सुरू आहे.
काय होतं प्रकरण..
या सत्रात न्यायमूर्ती नागरकोइलकडून खटल्याची सुनावणी करत होते, याचिकाकर्त्याचे वकील व्ही राघवाचारी एका ठिकाणी होते आणि सॉलिसिटर जनरल आर षणमुगसुंदरम शहरातील दुसऱ्या ठिकाणाहून सुनावणीला उपस्थित होते. हा विषय धर्मपुरी जिल्ह्यातील एका मंदिराशी संबंधित आहे. हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभागाशी संलग्न असलेल्या निरीक्षकांना तसेच मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांना रथयात्रा थांबवण्याचे आदेश देण्याचा अधिकार नाही, असे न्यायमूर्ती म्हणाले. त्यांनी हा आदेश फेटाळून लावला.
या प्रकरणी सॉलिसिटर जनरल यांनी न्यायमूर्तींना सांगितले की, उत्सवाचे आयोजन करण्यात सरकारला कोणतीही अडचण नाही. सर्वसामान्यांच्या सुरक्षेचीच सरकारची काळजी आहे. ते म्हणाले की, सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे तंजोर जिल्ह्यात नुकतीच अशाच एका रथयात्रेत मोठा अपघात झाला होता, मंदिराच्या उत्सवाचे आयोजन करताना सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायाधीशांनी मंदिर अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच शासकीय वीज वितरण कंपनी तांगेडको रथयात्रा सुरू झाल्यापासून शेवटापर्यंतच काही तास परिसरातील वीज खंडित करणार आहे.
गेल्या महिन्यात तंजोरजवळील एका मंदिराचा रथ मिरवणुकीदरम्यान एका हाय-टेन्शन इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आला होता. या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने तंत्रज्ञानाचा वापर करून ही अनोखी सुनावणी पूर्ण केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.