madras high court 
देश

घटस्फोटानंतर मुलांना भेटायला आलेल्या नवऱ्याला पाहुण्याप्रमाणे वागवा - HC

यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

घटस्फोट झालेल्या जोडप्यातील भेटीच्या अधिकाराशी संबंधित एक प्रकरण हाताळताना मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. वेगळे झालेल्या जोडीदारांनी मुलांसमोर दया आणि सहानुभूतीने एकमेकांशी वागले पाहिजे, अशी सुनावणी एका याचिकेवर करण्यात आली आहे.

या सुनावणी दरम्यान न्यायाधीश म्हणाले, पती आणि पत्नीमध्ये वैयक्तिक कारणांमुळे वाद असतील तरीही मुलांसमोर त्यांनी जोडीदाराशी सहानुभूतीने वागावे. मुलांकडे लक्ष देऊन जोडीदाराला किमान पाहुण्यासारखी वागणूक द्यावी. कारण आपल्या देशात पाहुण्याला अतिथी देवो भव मानले जाते.

संबंधित पालकांनी पाल्यांच्या मनात वडील किंवा आईविषयी कोणताही द्वेष किंवा भीती बाळगली जाईल असे कृत्य करु नये किंवा मुलांना तसे शिकवू नये. यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी हे धोक्याचे ठरु शकते.

दरम्यान, मुलांना आपल्या दोन्ही पालकांसोबत सुरक्षित आणि प्रेमळ नातेसंबंध निर्माण करण्याचा अधिकार आहे. अधिकार असताना मुलांना पालकांच्या प्रेमापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांचे बाल शोषण करण्याचा प्रकार होऊ शकतो. द्वेष ही भावना नैसर्गिकरित्या येते, त्यामुळे यासंदर्भात पालकांनी सजग राहण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

याप्रकरणी न्यायाधिशांनी सांगितले की, एका प्रकरणात वडिलांना आठवड्यातील काही काळासाठी मुलाला त्यांच्या निवासस्थानी घेऊव जाण्याची परवानगी होती. मात्र, पत्नीने त्याची अंमलबजावणी करण्यात अडचण येत असल्याचे सांगून दुरुस्तीची मागणी केली होती. यानंतर कोर्टाने या आदेशात बदल करून वडिलांना दर शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी आईच्या घरी मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती.

दरम्यान, या सुनावणीत पती-पत्नींनी कोणतीही तक्रार न करता न्यायायलाच्या आदेशांचे पालन करावे. याशिवाय पालकांची विभक्त होण्याची इच्छा नसल्यास मुलांना पालकांसोबत वेळ घालवण्यासाठी तयार करावे असे निर्देश न्यायायलाने देण्यात आले होते.

प्रत्येक मुलाला आई-वडील असे दोघांचेही प्रेम मिळण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सांगितले की, पती-पत्नींमध्ये कितीही मतभेद असले, तरी मुलांचा एकमेकांवर हक्क असणार आहे. त्यामुळे कोणत्याही मुलाला पती किंवा पत्नीचा सहवास नाकारला जाऊ शकत नाही. याप्रकरणी 29 जुलै रोजी संबंधित पत्नीला पतीला मुलांसोबत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT