Mamata Banerjee Sakal
देश

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

West Bengal Election 2026 : जाणून घ्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आगामी निवडणुकीबाबत नेमका काय निर्णय घेतलाय?

Mayur Ratnaparkhe

TMC to contest West Bengal elections independently : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष त्यांचे प्रतिस्पर्धी असतील. तर ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम देखील या निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे.

याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये ‘एसआयआर’विरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यांनी स्वतः एसआयआर प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. असे म्हटले जात आहे की, ममता बॅनर्जींसाठी ही प्रक्रिया मोठी अडचण बनत आहे.

कारण, या प्रकियेतून जर पश्चिम बंगालमधील मोठ्या संख्येने बनावट मतदार, विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील मतदारांना अंतिम मतदार यादीतून काढून टाकले गेले, तर तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.

कारण, बंगालमध्ये अल्पसंख्याक मतदारांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते, जे टीएमसीसाठी फायदेशीर ठरतात. बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या २७ टक्के आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तर अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT