ममता बॅनर्जी संग्रहित छायाचित्र
देश

सीबीआयने फक्त भाजपचे ऐकल्यास आम्ही त्यास विरोध करु - ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी आक्रमक, भाजपला दिला इशारा

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : रामपूरहट घटनेमागे षडयंत्र असल्याचे मला वाटते. या घटनेची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडे (सीबीआय) देण्यात आले. हा चांगला निर्णय आहे. मात्र सीबीआयने फक्त भाजपच्या दिशानिर्देशांचे पालन केल्यास आम्ही त्यास विरोध करु, असा इशारा पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचा (Trinamool Congress Party) कार्यकर्ताचा खून दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याने केला. मात्र केवळ तृणमूलवरच चहूबाजूंनी टीका केली जात आहे. घटनेच्या चौकशीसाठी आम्ही अनेक पावले उचलली असून त्यातून रामपूरहट प्रकरणामागील खरे कारण समजेल, असे बॅनर्जी म्हणाल्या. (Mamata Banerjee Says, If CBI Only Follow BJP's Directions, Then We Protest)

उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, त्रिपुरा आणि आसाम या ठिकाणी अशा अनेक घटना घडतात. मात्र आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावर जाऊ दिले गेले नाही. मात्र बिरभूम घटनास्थळी जाण्यास आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला रोखलेले नाही. काही दिवसांपूर्वी बिरभूम जिल्ह्यात तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर आठ जणांना जिवंत जाळून टाकण्यात आले. यातील २० पेक्षा अधिक आरोपींना पकडण्यात आले आहे.

या घटनेनंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करुन घेतली होती. नंतर न्यायालयानेच बिरभूम प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावे असे आदेश दिले. भाजप व तृणमूलमध्ये या घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT