man burnt alive in love affair with women police angry villagers torched three police vehicles at up 
देश

महिला पोलिस शिपायाची काढली छेड अन्...

वृत्तसंस्था

प्रतापगड (उत्तर प्रदेश) : एक युवक महिला पोलिस शिपायावर एकतर्फी प्रेम करत होता. महिला शिपायाची छेड काढल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटून आला आणि पुन्हा छेड काढली. यानंतर काही लोकांनी त्याला झाडाला बांधून जिवंत जाळले.

राज्यातील फतनपूर पोलिस ठाण्यातील भुजनी गावत ही घटना घडली असून, यानंतर खळबळ उडाली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या मोटारींवर दगडफेक करत मोटारींची जाळपोळ सुरू केली. ग्रामस्थांनी दोन पोलिस जीपसह तीन वाहनांना आग लावली. पोलिसांच्या दोन्ही जीप जळून खाक झाल्या असून, दगडफेकीत चार पोलिस जखमी झाले आहेत. गावात तणाव निर्माण झाल्यानंतर दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय, पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अंबिका पटेल असे जळून खाक झालेल्या युवकाचे नाव आहे. तो कानपूरमध्ये तैनात असलेल्या एका महिला पोलिस शिपायावर प्रेम करत होता. महिला शिपायाच्या कुटुंबीयांनी अंबिका पटेल याला जिवंत ठार मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. अंबिका पटेल महिला शिपायाची छेडछाड केल्याबद्दल काही दिवस कारागृहात होता. पण, काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटला होता.

अंबिका पटेला याला झाडाला बांधून जिवंत जाळल्यानंतर गावात जाळपोळ सुरू झाली. पोलिसांवर हल्ला सुरू झाल्यानंतर पोलिसांची जादा कुमक गावाबाहेर उभी होती. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नागरिकांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, 'अंबिका पटेल याला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे. हत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या तीन वाहनांना आग लावली आणि पोलिसांवर दगडफेक केली. काही महिन्यांपूर्वी कानपूरमध्ये नेमणूकीवर असलेल्या महिला शिपायाचे छायाचित्र मृत युवकाने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांनी अंबिका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

Mumbai Local News: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : ऑगस्ट २०२७पर्यंत पिण्याचं पाणी सुरक्षित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT