man killed in illicit relations with married woman at delhi 
देश

नवऱयाला 'त्या' व्हिडिओबद्दल सगळं सांगितलं अन्...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: प्रियकराने विवाहीत महिलेचा अश्लिल व्हिडिओ तयार केला होता. व्हिडिओची धमकी देवून नेहमी बोलवायचा. या छळाला कंटाळून महिलेने नवऱयाला विश्वासात घेऊन माहिती दिली. दोघांनी मिळून प्रियकरचा खून केला आणि मृतदेह फेकून दिला.

रोहिणी जिल्ह्यात ही घटना घडली असून, पोलिसांनी मृतेहाची ओळख पटून दोघांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर नावाच्या युवकाचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. अमरने शारिरीक संबंध ठेवण्यासाठी एक खोली भाड्याने घेतली होती. अमरने मोबाईलमध्ये महिलेचे अश्लिल व्हिडिओ कैद केले होते. अश्लिल व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन तो खोलीवर बोलवत असायचा. महिला या छळाला कंटाळली होती. नवऱयाला विश्वासात घेऊन तिने व्हिडिओबद्दल सांगितले. दोघांनी अमरला कायमचे संपवायचे ठरवले.

अमरला घरी बोलावल्यानंतर चहामधून झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपल्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला. मृतदेह अज्ञात ठिकाणी टाकून दिला. दुसरीकडे अमरच्या वडिलांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मृतदेह पाहून तो अमरचा असल्याचे वडिलांनी ओळखले. पोलिसांनी अमरचे मोबाईल लोकेशन तपासून माहिती काढली. महिला आणि तिच्या नवऱयाला ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी खुनाची कबुली दिली. याबाबातचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT