Mani Shankar Aiyar says he is Gandhian and Nehruvian but not Rahul supporter, sparking debate within Congress leadership.

 

esakal

देश

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Mani Shankar Aiyar on Rahul Gandhi : ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीच थेट हे मोठं विधान केल्यान, काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

Mayur Ratnaparkhe

Mani Shankar Aiyar Statement : ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर हे त्यांचा वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांनी वादही निर्माण केलेले आहेत. तर कित्येकदा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेली विधान ही काँग्रेससाठी डोकेदुखी देखील ठरलेली आहेत. आताही मणिशंकर अय्यर यांचं असंच एक वक्तव्य समोर आलं आहे, ज्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

मणिशंकर अय्यर यांनी अलिकडे असंख्य विधाने केली आहेत, ज्यामुळे पक्षात वाद निर्माण देखील झाला आहे. तर अलिकडेच अय्यर यांनी पिनारायी विजयन यांनी पुन्हा केरळचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. एवढंच त्यांनी विरोधी सरकारच्या विविध कामगिरीचे कौतुकही केले. यामुळे काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाला होता.

अन् आता तर अय्यर यांनी थेट काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींवरच   निशाणा साधत आणखी एक विधान केलय. एका निवेदनात अय्यर यांनी म्हटले आहे की ते "राहुलवादी" नाहीत.  माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधींबद्दल एक विधान केले. मणिशंकर अय्यर म्हणाले, "डॉ. आंबेडकरांचे चरित्र 'ए पार्ट बट अपार्ट' आहे. मी एवढेच म्हणू शकतो. राहुल गांधी विसरले आहेत की मी पक्षाचा सदस्य आहे. म्हणून, मी गांधीवादी आहे, नेहरूवादी आहे, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही." अर्थात, मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा गोंधळ वाढला आहे.

अलिकडेच ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनीही सत्ताधारी एलडीएफ सरकारच्या पंचायती राज मॉडेलचे कौतुक केले. मात्र, काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आणि म्हटले की ते वैयक्तिक पातळीवर केले गेले आहेत. तर केरळमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत, मणिशंकर अय्यर यांच्या अशा भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाला अडचणी येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT