BSP chief Mayawati addressing a press conference announcing her party’s independent participation in the Bihar Assembly elections.

 

esakal

देश

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Mayawati’s Major Political Announcement for Bihar : निवडणूक आयोगाच्या पत्रकारपरिषदेवरही दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत बसपा सुप्रीमो?

Mayur Ratnaparkhe

Mayawati declares BSP will contest Bihar Assembly Elections independently : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज(सोमवार) निवडणूक आयोगाने घोषणा केली. यानंतर आता बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायवती यांनी निवडणूक आयोगाच्या या घोषणेचे स्वागत केले आणि याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीबाबत बसपाची भूमिका स्पष्ट करत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मायावती यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बहुप्रतीक्षित बिहार राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन टप्प्यात ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याच्या, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत आहे.

तसेच मायवती पुढे म्हणाल्या, निवडणूक आयोग व्यापक जन आणि देशहीत तसेच देशात लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची व्यवस्था जनतेच्या इच्छेनुसार वास्तविकदृष्ट्या स्वतंत्र, निष्पक्ष तसेच धन आणि ताकदीच्या प्रभावापासून मुक्त असल्याची खात्री करेल. याचबरोबर, आयोग पोलिस आणि सरकारी यंत्रणेच्या दुरुपयोगास रोखण्यासाठी कडक आणि प्रभावी पावलं उचलेल.

याशिवाय, बसपाचे बिहारच्या लोकांना विशेष आवाहन आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांद्वारे प्रत्येक नागरिकास दिल्या गेलेल्या मतदानाच्या अतिमहत्त्वपूर्ण संविधानिक अधिकाराचा वापर करण्यासाठी लोकशाहीच्या या उत्सवात शांततेत आणि उत्साहाने सहभागी व्हावे. असंही मायवतींनी सांगितलं.

मायावतींनी केली मोठी घोषणा –

याचबरोबर मायावतींनी या निवडणुकीबाबत बसपाची भूमिका स्पष्ट करत मोठी घोषणा केली की, बिहार विधानसभा निवडणूक बहुजन समाज पार्टी स्वबळावर जवळपास सर्वच जागांवर लढणार आहे. ज्याच्या तयारीसाठी पक्षाचे प्रत्येक पातळीवरील कार्यकर्ते खूप आधीपासून सक्रीय झालेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांच्या नेतृत्वात  सर्वजन हिताय जागरण यात्रा इत्यादीचेही आयोजन केले गेले आहे.

तसेच, पक्षाला अपेक्षा आहे की, बिहारचे लोक आपल्या राज्यात कायद्याद्वारे कायद्याचे राज्य या आदर्श व्यवस्थेसाठी सर्वजन हिताय व सर्वजन सुखायच्या बाजूने हत्ती निवडणूक चिन्हावर मतदान करून बसपाच्या उमेदवारांना निश्चित विजयी करतील. असाही आशावाद मायावती यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

हरिहरेश्वर मंदिरात रक्तरंजित थरार! आईने पोटच्या मुलीवर केला धारदार शस्त्राने वार; स्वतःला संपवून घेण्याचाही प्रयत्न

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

SCROLL FOR NEXT