Meghalaya Assembly Election Result 2023 esakal
देश

Meghalaya Election : मेघालयात फक्त 2 जागा जिंकणाऱ्या भाजपचा NPP ला पाठिंबा; संगमा होणार CM

नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party NPP) मेघालयात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मेघालयात NPP नं 59 पैकी 26 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेस-टीएमला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत.

शिलाँग : नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party NPP) मेघालयात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. भारतीय जनता पक्षानं (BJP) त्यांना पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्री कॉनराड के संगमा (Conrad K Sangma) यांनी शुक्रवारी राज्यपालांकडं राजीनामा सुपूर्द केला आणि नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला.

‘भाजपचा आम्हाला पाठिंबा’

संगमा म्हणाले, "भाजपनं आम्हाला औपचारिक पाठिंबा दिला आहे. आम्ही राज्यपालांना भेटू आणि त्यांना विनंती करू की, नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करा. आमच्याकडं सत्ता स्थापनेसाठी अधिक संख्याबळ आहे. तसेच आम्हाला माहिती मिळाली आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, आम्ही पीएमओकडून माहिती घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

मेघालयात NPP नं 59 पैकी 26 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेस-टीएमला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवाय, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) नं 11 मतदारसंघ जिंकले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. यूडीपीला 2018 मध्ये केवळ सहा जागा मिळाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मृणाल दुसानिसने अमेरिका का सोडली? सांगितलं खरं कारण; म्हणाली, 'आमचं नवीन लग्न झालेलं तेव्हा...'

Toxic Cough Syrup: पेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा खोकल्याच्या औषधात वापर? १४ हुन अधिक मुलांचा मृत्यू

Nanded Ajit Pawar NCP माजी तालुकाध्यक्षाची गुंडगिरी, ५० हजारांच्या खंडणीसाठी, टोल नाक्यावर तोडफोड | Sakal News

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

ऐश्वर्याचं सुपरहिट 'कजरा रे' गाणं गाणाऱ्या गायिकेला मिळालेलं निव्वळ इतकं मानधन; म्हणाली "माझी किंमत नाही"

SCROLL FOR NEXT