esakal

देश

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

Illegal coal mine explosion: पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख; मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत केली जाहीर

Mayur Ratnaparkhe

Death Toll Rises to 18 in Illegal Coal Mining Explosion : मेघालयमध्ये पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात आज एक भीषण दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी अवैध कोळसा खाणीत झालेल्या भयानक स्फोटात आतापर्यंत १८ कामगारांना जीव गमावावा लागला आहे. तर, या खाणीत आणखी काहीजण अडकले असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सुरूवातीला या घटनेत दहा कामगारांच्या मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते.  नंतर १६ आणि आता हाती आलेल्या माहितीनुसार १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनएरएफ) प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, तर जखमींना ५० हजार रुपये मिळतील अशी घोषणा मोदींनी केली आहे.

 अधिकृत माहितीनुसार, मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील एका बेकायदेशीर कोळसा खाणीत गुरुवारी झालेल्या स्फोटात किमान १८ कामगारांचा मृत्यू झाला आणि अनेक जण अडकल्याची भीती आहे. पोलिस महासंचालक  आय नोंगरांग यांनी ही माहिती दिली आहे.

 डीजीपी म्हणाले की, ही घटना थांगस्कू परिसरात घडली आणि बचाव पथके शोध मोहीम राबवत आहेत. ते म्हणाले, "आम्हाला आतापर्यंत १६ मृतदेह सापडले आहेत, परंतु स्फोटाच्या वेळी खाणीत किती लोक होते याची अचूक माहिती आमच्याकडे नाही. आणखी बरेच जण अडकल्याची भीती आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT