Girl Sexually Abused  Sakal
देश

धक्कादायक! बनावट आधारकार्ड बनवून अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार

अल्पवयीन मुलीचे खोटं आधारकार्ड बनवून तिच्याशी लग्न करून वर्षभर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

एका अल्पवयीन मुलीचे खोटं आधारकार्ड (Aadhar Card) बनवून तिच्याशी लग्न करून वर्षभर बलात्कार (Sexually Abused) केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाजियाबाद जिल्ह्यातील मुरादनगरमध्ये घडला आहे. एका घरामध्ये बंधक बनवलेल्या या 17 वर्षीय पिडीत तरुणीने कशीबशी नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. (Minor Girl was raped for a year by marrying her with a fake Aadhaar card in Uttar Pradesh.)

पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह मुरादनगर येथे राहते. वर्षभरापूर्वी तिची एका तरुणाशी ओळख झाली होती. त्याच्या बोलण्याला ती भुलली. तरुणाने तिचं बनावट आधार कार्ड बनवून न्यायालयात लग्नाची नोंद करून घेतली. यानंतर तो तिला एका घरात घेऊन गेला आणि तिला ओलीस ठेवलं. तरूणाने तिला घराबाहेरही पडू दिले नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.

पिस्तुल दाखवून आरोपीने तिच्यावर वर्षभर तिच्यावर बलात्कार केला असल्याचं आरोप पीडितेने केला आहे. तिने विरोध केला असता त्यांनं तिला बेदम मारहाण केल्याचंही तिने सांगितले. 25 जानेवारी रोजी आरोपीने तिला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिने ओरडाओरडा केला तेव्हा शेजारी आले आणि तिथून ती कशीतरी पळून गेली. तिथून बाहेर पडल्यावर तिने थेट मुरादनगर पोलिस ठाणे गाठली आणि झालेला प्रकार सांगितला. तक्रारीच्या आधारे तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा जबाब नोंदवला जाईल असंही पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT