Mizoram Assembly Election esakal
देश

Mizoram Election : मिझोरामच्या निवडणुकीत 'हा' मुद्दा ठरणार कळीचा; चुरशीच्या लढतीत कोण मारणार बाजी?

सध्या एमएनएफचे सरकार असून हा पक्षा सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.

सकाळ डिजिटल टीम

मिझोराम विद्यापीठाचे प्रोफेसर जे. डोंगेल यांनी निर्वासितांच्या मुद्द्याचा झोरामथांगा यांना फायदा मिळेल, असा दावा केला आहे.

एेजॉल : १९८७ रोजी मिझोरामची (Mizoram Election) निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front) किंवा काँग्रेसची (Congress) सत्ता राहिली. मिझोरामधील नवा राजकीय दबाव गट झोरम पीपल्स चळवळीच्या उदयामळे दुहेरी समीकरण निर्माण झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) प्रमुख मुकाबला मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झेडपीएम, कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात होणार आहे. सध्या एमएनएफचे सरकार असून हा पक्षा सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मिझो शांतता करार केल्यानंतर मिझोराम राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर या पक्षाने तीन वेळेस सत्ता सांभाळली आहे.

त्याचवेळी काँग्रेस चार वेळेस सत्तेत राहिली. राजकीय विश्‍लेषकांच्या मते, झोरामथांगा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राज्यातील प्रमुख योजना, सामाजिक आर्थिक विकास धेारण, (एसईडीपी) नुसार आर्थिक साह्य, म्यानमार, बांगलादेश येथील निर्वासितांना हाताळण्याच्या मुद्दा यावर आघाडी मिळू शकते.

तसेच मणिपूरमधील हिंसाचार आणि त्यामुळे झालेले स्थलांतर या आघाडीवर सरकारने केलेल्या कामाचा मतदारांवर परिणाम हेाऊ शकतो. मिझोराम विद्यापीठाचे प्रोफेसर जे. डोंगेल यांनी निर्वासितांच्या मुद्द्याचा झोरामथांगा यांना फायदा मिळेल, असा दावा केला आहे. विशेषत: मणिपूरच्या नागरिकांना दिलेला आश्रय. झोरामथांगा यांनी चांगल्या रीतीने परिस्थिती हाताळल्याने विरोधकांकडे सध्यातरी कोणताही मुद्दा दिसत नाही.

  • एकूण जागा

  • ४०

  • एकूण मतदार

  • ८.५२ लाख

  • पुरुष मतदान

  • ४.१३ लाख

  • महिला मतदार

  • ४.३९ लाख

  • १८- १९ वयोगट

  • ५०.६ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT