Monkeypox Vaccine Marathi News
Monkeypox Vaccine Marathi News Monkeypox Vaccine Marathi News
देश

Monkeypox Vaccine : मंकीपॉक्स लसीवर नीती आयोगाचे सदस्य पॉल यांनी दिले उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात मंकीपॉक्सची प्रकरणे येऊ लागली आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. खरंतर मंकीपॉक्सची कोणतीही लस नाही. चेचकसाठी एक लस नक्कीच आहे. मंकीपॉक्स लसीवर (Monkeypox Vaccine) नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी उत्तर दिले आहे. (Monkeypox Vaccine Marathi News)

एका व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याच्या संशयावरून दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. राष्ट्रीय राजधानीत मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये तो नाही. त्यांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे. रुग्णाच्या अंगावर पुरळ आणि जखमा आढळल्या आहेत. त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवले आहे.

दिल्लीतील रहिवासी असलेल्या व मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीने शरीरात दुखत असल्याची तक्रार केली आहे. इतर लक्षणे तपासण्यासाठी त्याचे निरीक्षण केले जात आहे. राष्ट्रीय राजधानीत मंकीपॉक्सची लागण झालेल्या पहिल्या रुग्णावर एलएनजेपी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहे.

लसीबाबत काय म्हणाले पॉल?

मंकीपॉक्सवर अद्याप कोणतीही लस (Monkeypox Vaccine) उपलब्ध नाही. मंकीपॉक्सची लस विकसित करता येईल का याचा आम्ही विचार करीत आहोत. यासाठी आम्ही लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. मंकीपॉक्सची लस बनवण्याची गरज असल्यास लस बनवण्याची आमच्याकडे मजबूत क्षमता आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.

भारतात चार प्रकरणांची पुष्टी

देशात कोरोनाचा धोका असताना मंकीपॉक्सनेही (Monkeypox) दार ठोठावले आहे. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या चार प्रकरणांची पुष्टी झाली आहे. सरकारने काही आठवड्यांपूर्वीच सक्रिय पावले उचलली आहेत. विमानतळावर स्क्रीनिंगसह लॅब तयार केल्याचे मंगळवारी डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT