Monkeys
Monkeys 
देश

Video : 'आम्ही जातो आमच्या गावा'; माकडे निघाली जंगलाकडे!

वृत्तसंस्था

सिमला : कोरोना संसर्गामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झालेले असताना प्राण्यांनाही त्याचा फटका बसत आहे. कोरोनामुळे जगात लॉकडाउन असल्याने बाजारपेठ ठप्प आहे आणि पर्यटन व्यवसायही मंदावला आहे. अशा स्थितीत पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाउनमुळे हिमाचल प्रदेशातील शहरी भागात असलेल्या माकडांनी आपला मोर्चा गावाकडे आणि जंगलाकडे वळविला आहे. हिमाचल किसान सभेचे कुलदिप सिंह तंवर म्हणतात, शहरी भागातील मंदिर बंद असल्याने आणि पर्यटनस्थळ बंद असल्याने नागरिकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे या भागात वास्तव्य करणारी माकडे आता ग्रामीण भागाकडे जात आहेत.

जखू मंदिरातील पुजारी मदन शर्मा म्हणाले, की गेल्या चार दशकांपासून मंदिराच्या परिसरात माकडांची फौज असायची, आता मात्र कोणीही दिसत नाही. खायला मिळत नसल्याने शहरातील माकडे असून नसल्यासारखी आहेत. परंतु ही माकडे खेड्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते, असे ते म्हणाले.

या माकडांकडून पिकांची आणि फळबागांची हानी होऊ शकते. गेल्या तीन वर्षापासून माकडांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे माकडांना पायबंद घालण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात. त्यांना जंगलात पाठवण्याची हिच योग्य वेळ आहे. तसेच त्यांच्या आहाराची देखील सोय करायला हवी, अशी अपेक्षा तंवर यांनी व्यक्त केली.

या दरम्यान, कृषी विभागाचे मुख्य सचिव ओकांरचंद शर्मा म्हणाले की, माकडांना अगोदरच उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर केले आहे. यात कृषी विभागाचा फार सहभाग नसल्याने यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी वनविभागाला विनंती करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT