Morbi bridge collapse Jaysukh Patel of Oreva Group surrenders before the court of Chief Judicial Magistrate in Morbi  
देश

Morbi Bridge Collapse : ओरेवा ग्रुपचे एमडी जयसुख पटेल यांचे न्यायालयापुढे आत्मसमर्पण

रोहित कणसे

Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी आरोपी असलेले ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जयसुख पटेल यांनी मंगळवारी मोरबी येथील सीजेएम न्यायालयात आत्मसमर्पण केले. यापूर्वी सीजेएम कोर्टाने जयसुख पटेल विरोधात वॉरंट जारी केले होते.

गेल्या वर्षी मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळून १३५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. ज्यामध्ये ओरेवा ग्रुपचे चार कर्मचारी सहभागी होते. त्यापैकी दोन कंपनी मॅनेजर आणि दोन लिपिक आहेत.

एफआयआरमध्ये जयसुख पटेल यांचे नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आले आहे. जयसुख पटेल यांनी २० जानेवारी रोजी मोरबीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता.

गुजरात हायकोर्टही या प्रकरणाची दखल घेत स्वतः सुनावणी करत आहे. उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात अजिंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड (ओरेवा ग्रुप) या कंपनीला नोटीस बजावली होती, जी मोरबी सस्पेंशन ब्रिजची देखभाल करते. या कारवाईत कंपनीला प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली होती. अपघातामुळे झालेल्या नुकसानासाठी जबाबधार धारावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT