Mother Killed Daughter  Sakal
देश

वॉशिंग मशिनमध्ये घालून मुलीला मारलं ठार; ओव्हनमध्ये लपवला मृतदेह

आईनं दोन महिन्यांच्या मुलीला वॉशिंग मशिनमध्ये घालून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये ओव्हनमध्ये एका दोन महिन्याच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. या हत्येची उकल करण्यात मंगळवारी पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी मुलीची आई डिंपल कौशिक हिला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी महिलेने वॉशिंग मशिनमध्ये टाकून मुलीची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह ओव्हनमध्ये लपवून ठेवल्याचा खुलासा मालवीय नगर पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी केला आहे. (Mother kills daughter by putting her in washing machine; Corpses hidden in the oven)

पोलिस उपायुक्त बनिता मेरी जॅकर यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी 3.30 वाजता दोन महिन्यांची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, मुलगी घराच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या खराब ओव्हनमध्ये बंद असल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान चार वाजता रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.

मयत मुलीचे वडील, आजोबा आणि चुलते त्यांच्या दुकानात बसले होते, असं पोलीस चौकशीत समोर आले. चुलते दुसऱ्या मजल्यावर गेले असता त्यांना मुलगी दिसली नाही. यानंतर त्यांनी इतर सदस्यांना विचारणा केली असता मुलीचा शोध सुरू करण्यात आला. शोधाशोध केल्यानंतर खोलीतील बिघडलेल्या ओव्हनमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर आईकडून खुनाची कबुली :

पोलिसांनी संशयाच्या आधारे मृत मुलीची आणि तिचा पती गुलशन यांची चौकशी सुरू केली. बरीच चौकशी केल्यानंतर महिलेने खुनाची कबुली दिली. महिलेने सांगितले की, तिने मुलीचे तोंड बंद केलं होतं. नंतर तिला वॉशिंग मशिनमध्ये टाकलं आणि नंतर तिचा मृतदेह खराब झालेल्या ओव्हनमध्ये लपवला.

मुलगा हवा होता पण मुलगी झाली म्हणून केलं कृत्य-

कुटुंबीयांचा आरोप आहे की डिंपलला मुलगा हवा होता, मात्र मुलगी झाल्यामुळे ती नाराज होती. त्यामुळे तिने हे कृत्य केलं आहे. तपास आणि पुराव्यांच्या आधारे महिलेवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT